Prakash Mahajan On Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Mahajan On Uddhav Thackeray : 'उद्धव यांनी राज ठाकरेंची पाद्यपूजा करावी'; प्रकाश महाजन हे काय बोलून गेले

Pradeep Pendhare

Mumbai News : मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलेच सुनावले. "राज ठाकरे यांचे हिंदुत्व विज्ञानवादी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांची पाद्य पूजा करण्याऐवजी राज ठाकरे यांची पाद्य पूजा करायला हवी होती", अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना फटकारले आहे.

"राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे विचार हे खरे हिंदुत्ववादी आहेत. प्रगतीशील आणि पर्यावरणवादी आहेत. विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून हिंदुत्व शिकवणारा नेताच खरा हिंदू नेता असतो. राज्यात आणि देशात अशा एकच नेते, राज ठाकरे हे आहेत. गेल्या 50 वर्षात हिंदुत्वाचे प्रगतीशील आणि पर्यावरणवादी विचार कोणी मांडले असतील, तर ते राज ठाकरे मांडत आहेत. राज ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार जुन्या रूढी परंपरा घेऊन चालणारे नाहीत. प्रबोधनकार ठाकरे असते, तर राज ठाकरे या नातवाबद्दल अभिमान वाटला असता, तर आचार्य अत्रे असते, तर गेल्या 10 हजार वर्षात असा हिंदू नेता जन्माला आला नाही", असे मत राज ठाकरेंविषयी नक्कीच व्यक्त केले असते, असे प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.

राज ठाकरे यांच्या विज्ञानवादी हिंदुत्वाची कौतुक करताना प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टोलेबाजी केली. 'उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांची पाद्य पूजा करण्याऐवजी राज ठाकरे यांची पाद्य पूजा करायला हवी. कारण ते खरे हिंदुत्व विज्ञानवादी आहे', असे प्रकाश महाजन यांनी म्हणत उद्धव ठाकरे आणि शंकराचार्यांना अंगावर घेतले.

सक्षम तिसरा पर्याय

राज ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे विधानसभा निवडणुकीत 200 ते 250 जागा लढणार असल्याच्या घोषणेने राज्यातील मनसे सैनिकांमध्ये उत्साह संचारला असल्याचा दावा प्रकाश महाजन यांनी केला. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन पर्यायावरच असल्याचे दाखवले जात होते. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आता मनसे सक्षम तिसरा पर्याय जनतेसमोर असणार आहे, असे सांगून राज ठाकरे यांचा राज्य दौरा सुरू होताच, त्याचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही प्रकाश महाजन यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT