Mumbai News : लोकसभा निवडणुकीत कट्टर शिवसैनिक राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर ठाणे शहरातील शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. युवा सेनेचे पदाधिकारी अंतर्गत गटबाजीला कंटाळून सामूहिक राजीनामे देत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना संघटन बांधणीचे आव्हान असतानाच, ठाणे शहरातील युवा सेनेने नाराजी समोर येत सामूहिक राजीनाम्यांमुळे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना हादरा बसला आहे. राजीनामा देणारे युवा सेनेचे पदाधिकारी हे राजन विचारे यांचे कट्टर समर्थक आहेत. या पदाधिकाऱ्यांनी शिवेसना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केलय.
ठाणे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी, शहरअधिकारी किरण जाधव, बालकुमचे शिवसेना (Shiv Sena) शाखाप्रमुख अभिषेक शिंदे, उपसमन्वयक दिपक कनोजिया, खोपटचे विभाग अधिकारी राज वर्मा या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचे पत्र आदित्य ठाकरे यांना पाठवले आहे. युवा सेना स्थापन झाल्यापासून, गेली 15 वर्षांपासून युवा सेनेसोबत काम करत आहेत. दिवस-रात्र ठाणे शहरात युवकांचे संघटन प्रामाणिकपणे उभारले. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो. वेळप्रसंगी विरोधकांना अंगावर घेतले. परंतु गेल्या 2 वर्षांपासून काही निवडक पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत गटबाजी चालू केली आहे. आमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आम्ही सामूहिकरित्या पदाचा राजीनामा देत आहे, असे राजीनामा पत्रात म्हटले.
युवा सेनेचे राजीनामा देणारे पदाधिकारी हे कट्टर शिवसैनिक राजन विचारे यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहे. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीला राजन विचारे यांचा पराभव झाला. यानंतर ते काहीसे पक्ष संघटनेत चर्चेपासून दूर आहेत. यातच त्यांच्याच कार्यकर्त्यांनी संघटनेचे सामूहिक राजीनामे दिल्याने येणाऱ्या काळात ठाणे शहरात शिवसेनेचे आणखी पडझड होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या संघटन नेतृत्वाला या सामूहिक राजीनाम्यामुळे मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाणे शहरात शिवसेनेची होणारी ही पडझड संघटनेसाठी चिंतेच विषय बनू शकते.
सामूहिक राजीनामे देणारे पदाधिकारी आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर हे पदाधिकारी आज सांयकाळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. तसे झाल्यास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युवा सेनेला ठाणे शहरात खिंडार पडणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही ठिकाणी अनेक उलथापालथी होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटात अनेकजण नाराज आहे. परंतु ते सत्तेजवळ असल्याने सावध भूमिका घेऊन पुढचे निर्णय घेताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे पक्षात देखील तिच परिस्थिती आहे. महाविकास आघाडीविषयी राज्यात सहानुभूतीची लाट आहे. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळेल की, नाही याची शाश्वती नाही, त्यामुळे काही जण इतरत्र छुपी चाचपणी करताना दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.