Raj Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

MNS Melava: राज ठाकरेंनी भाषणाच्या पहिल्या 5 मिनिटांतच PM मोदींवर केला थेट वार'; म्हणाले, 'इराणला आपण मदत करायला हवी होती...'

MNS Gudhi Padwa Melava: मनसेकडून गुढी पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यात नेहमीप्रमाणे राज ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवर धडाडली. या भाषणात त्यांनी आखाती देशात पेटलेल्या इराण-इस्त्रायल अमेरिका युद्धावर थेट भाष्य केलं.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडत आहे. याच मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या गुढी पाडवा मेळाव्याच्या भाषणात पहिल्या पाच मिनिटांतच इराण-इस्त्रायल युद्धावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट पहिला वार केला.

मनसेकडून गुढी पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यात नेहमीप्रमाणे राज ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवर धडाडली. या भाषणात त्यांनी आखाती देशात पेटलेल्या इराण-इस्त्रायल अमेरिका युद्धावर थेट भाष्य केलं. ते म्हणाले, इराण आपला जुना मित्र राहिला आहे.. 'युद्धात मोदींनी इराणला साथ द्यायला हवी होती. खामेनेईंच्या मृत्यूनंतर भारत सरकारनं कोणतंही विधान केलं नाही. निषेध व्यक्त करणारं एकही ट्विट केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) इराण-इस्त्रायल हल्ल्याबाबत काही बोलले नाही. इराण जम्मू काश्मीरबाबत नेहमीच आपल्या बाजूनं उभा राहिला आहे. पण इराणच्या मागे जर आपण अडचणीच्या काळात उभे राहिलो नाही. याचा त्रास भविष्यात आपल्याला निश्चित होणार असल्याचं भाकीत राज ठाकरेंनी वर्तवलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांकडून काही महत्त्वाच्या गोष्टी राहून गेल्या आहेत. इराण आपल्याला संकटाच्या काळात नेहमीच साथ देत आला आहे. आपल्याला मिळणारे कच्चे तेल इराणकडून येते आणि तेही तो आपल्या काही रुपयांत देत आहे. मात्र, भारताने खामेनी गेल्यानंतर आणि इराणवर हल्ले होत असतानाही साधे निषेधाचं एक पत्रही काढलं नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राची सध्या परिस्थिती काय झाली आहे? असा सवाल उपस्थित केला. पण मुख्यमंत्री फडणवीसांकडून विकासाचा दावा केला जातो. तसेच ते महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 3 ट्रिलियन करणार असल्याचा सांगतात. पण महाराष्ट्रावर सध्या 11 लाख कोटींचं कर्ज आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हे कर्ज 2 लाख कोटी होतं असा दावाही यावेळी त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT