

Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे दोन्हीही नेते एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाही. सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दांत टीकेची झोड उठवली होती. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी सुरुवातीला कोण हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) असा प्रतिसवाल करत त्यांची खिल्ली उडवली होती. पण आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी संधी मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांना करारा जवाब देत जोरदार हिसका दाखवला आहे.
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात कॅप्टन अशोक खरातला महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राजकीय वातावरण तापलं असून गेल्या 24 तासांमध्येच या प्रकरणात अनेक हादरवणारे खुलासे समोर येत आहे. याचवरुन संधी मिळताच काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनाच टार्गेट केलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महिलेकडून बलात्कार व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झालेल्या अशोक खरात प्रकरणात एक खळबळ उडवणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात त्यांनी अंकशास्त्रज्ञ खरात याच्याकडून महिलांवर झालेल्या अत्याचाराची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
सोशल मीडियावरील पोस्टसोबत हर्षवर्धन सपकाळांनी अशोक खरात याचा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबतचा फोटोही जोडला आहे. यामुळे सपकाळांनी एकप्रकारे या माध्यमातून थेट मुख्यमंत्री फडणवीसांनाच आव्हान दिल्याची चर्चा आहे.
कॅप्टन अशोक खरात या बलात्कारी ज्योतीषीचा तुमच्या भारतीय जनता पक्षाशी व महायुती सरकारसोबत जवळचा संबंध आहे. यांच्या सारखे अनेक भोंदू तुम्ही स्वार्थासाठी पाळून ठेवलेत. आता याला वाचवण्याचा प्रयत्न चूकीने ही करू नका. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे लक्षात ठेवावे. सर्व 58 प्राप्त व्हिडिओतील पीडित महिला किंवा इतर ही महिलांवर झालेल्या अत्याचाराची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत काँग्रेस या प्रकरणात आक्रमक असल्याचाच इशारा दिला आहे.
ज्योतिषी अशोक खरातवर बलात्कार व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्याच आले आहेत. त्यानंतर त्यांच्याकडील पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले होते. तसेच त्याच्यावर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याच्या घराची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक असलेला स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेला कॅप्टन अशोक खरात याच्याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत.
अशोक खरातवर बलात्कार व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्याच आले आहेत. त्यानंतर त्यांच्याकडील पेनड्रायव्हमध्ये 58 व्हिडीओ सापडले होते. तसेच त्याच्यावर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. सध्या त्याच्या घराची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊसवर नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने रात्री उशिरा छापा टाकला. या छाप्यात पोलिसांच्या हाती शस्त्रसाठा आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या मिरगाव येथील फार्म हाऊसच्या झडतीदरम्यान पोलिसांना एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे सापडली आहेत. ती पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईमुळे अशोक खरातचे धाबे दणाणले असून, तपासात आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.