Prataprao Jadhav- Raksha Khadse - Murlidhar Mohol
Prataprao Jadhav- Raksha Khadse - Murlidhar Mohol  Sarkarnama
महाराष्ट्र

Modi Cabinet Portfolio Announcement : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? नेते आणि खाते 'एकाच क्लिक'वर

Deepak Kulkarni

Narendra Modi News : देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आलं आहे.या सरकारचा शानदार शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडले. एकूण 72 जणांनी शपथ घेतले. यात 31 कॅबिनट, 5 स्वतंत्र कारभार आणि 30 राज्यमंत्री पदांचा समावेश आहे.आता या मोदी सरकारच्या तिसर्‍या टर्ममधील खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,राजनाथ सिंह, नितीन गडकरी, एस जयशंकर, निर्मला सीतारामन यांच्याकडची खाती कायम ठेवण्यात आली आहे.या खातेवाटपात महाराष्ट्राच्या वाट्याला देखील सहा मंत्रिपदं आली आहे.

पंतप्रधानपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची सोमवारी (ता.10) पहिली बैठक पार पडली.या बैठकीनंतर आता केद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यात अमित शाह यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री,राजनाथ सिंह संरक्षण, निर्मला सीतारामण अर्थ, नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय,अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय,एस. जयशंकर यांना परराष्ट्र खातं तर शिवराज सिंह यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलं आहे.

तर महाराष्ट्रातील मंत्रि‍पदाची शपथ घेतलेल्यांपैकी मुरलीधर मोहोळ(Murlidhar Mohol) यांच्याकडे नागरी उड्डाण आणि सहकार, चंदक्रांत पाटलांकडे जलशक्ती,पियूष गोयल वाणिज्य आणि उद्योग कॅबिनेट मंत्री ,रक्षा खडसे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री,प्रतापराव जाधव- आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री, रामदास आठवले सामाजिक न्यायमंत्री हे खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

2 खासदारांना कॅबिनेट आणि 4 खासदारांना राज्यमंत्री...

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 2 खासदारांना कॅबिनेटमंत्री करण्यात आलं आहे.तर 4 खासदारांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. यामध्ये एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रिपद आहे.

महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आलं आहे. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या एकाही खासदाराला मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT