Sunil Tatkare On Chhagan Bhujbal: विरोधी भूमिका,'घरवापसी'ची चर्चा; तर तटकरे भुजबळांना म्हणतात, तुम्हालाही पक्ष वाढवायचा...

NCP 25th Foundation Day : राष्ट्रवादी काँग्रेसच्या धडाडती तोफ असलेल्या छगन भुजबळांनी घेतलेल्या काही विरोधी भूमिकांनंतर ते अजितदादांची साथ सोडून पुन्हा शरद पवार गटात परतणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण...
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal
Sunil Tatkare On Chhagan BhujbalSarkarnama

Mumbai News : राष्ट्र्रवादी काँग्रेसमधील बंडावेळी शरद पवारांचा सर्वात जास्त विश्वास असलेल्या नेत्यांनीही त्यांची साथ सोडली अन् ते अजित पवारांसोबत गेले. त्यात दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल,सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळांचाही समावेश होता. छगन भुजबळांच्या अजितदादांसोबत जाण्याने खुद्द पवारांसह अनेकांना धक्का बसला होता.हेच भुजबळ मागील काही दिवसांपासून त्यांच्या विधानांनी चर्चेत आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धडाडती तोफ असलेल्या छगन भुजबळांनी घेतलेल्या काही विरोधी भूमिकांनंतर ते अजितदादांची साथ सोडून पुन्हा शरद पवार गटात परतणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आता व्यासपीठावरुन भुजबळांकडे बघत तुम्हांला पक्ष वाढवायचा आहे असा चिमटा काढला. यावरुन पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला धक्का देत जोरदार मुसंडी मारली.तब्बल 31 जागांवर जिंकल्या.त्यात शरद पवार गटाने दहापैकी तब्बल 8 जिंकल्या.तर दुसरीकडे अजित पवार गटाला चारपैकी अवघ्या एका जागेवर यश मिळाले.

लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर यानंतर अजित पवार गटातले आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान करण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटात खळबळ उडाली आहे.याचवेळी आता तटकरेंच्या बोलण्याने भुजबळांबद्दलच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळणार असल्याची चर्चा झडू लागली आहे.

नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) तिकीट नाकारत तिथे शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली.त्यामागे त्यांची नाराजी असतानाच त्यांनी महाराष्ट्रात शरद पवार - उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळणार असल्याचे निकालाआधीच सांगितलं होतं. तसेच घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेवरुन एकीकडे महायुतीकडून ठाकरेंवर आरोपांच्याफैरी झाडल्या असतानात भुजबळांनी त्यावेळी उद्धव यांची बाजू घेतली.

Sunil Tatkare On Chhagan Bhujbal
MP. Shrirang Barne : मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट नाराज ; भाजपने फसवणूक केली खासदार बारणे कडाडले !

तसेच राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी महाड येथे मनुस्मृती दहन कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडल्यानंतर उद्भवलेल्या आंदोलनातही भुजबळांनी थेट आव्हाडांची बाजू घेतली.या त्यांच्या भूमिका महायुतीच्या विरोधातल्या होत्या.या त्यावरुन अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते.ते अजित पवारांची साथ सोडणार का अशीही चर्चा जोर धरु लागले होते. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरेंनीही याच धर्तीवर त्यांनी छगन भुजबळांना चिमटा काढला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर यंदा अहमदनगर आणि मुंबई अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अहमदनगर तर अजित पवार गटाचा मुंबईला होत आहे.अजित पवार गटाच्या मेळाव्यात सुनील तटकरेंनी खासदार झाल्यानंतर पहिल्याच तुफानी भाषण केले.

Sunil Tatkare On Chhagan Bhujbal
Modi 3.0 Cabinet: लोकसभेला निराशा: मंत्रिमंडळाच्या रचनेतून शिवसेना-राष्ट्रवादीला भाजपचा संदेश?

भुजबळांच्या विरोधी भूमिका...

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या घडामोडी पाहिल्या असता भुजबळ यांनी सातत्याने महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरु होत्या. मात्र,भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावताना सरकार,पालिका आमची मग उद्धव ठाकरेंचा काय संबंध म्हणत जाहीर पाठराखण केली होती.

आव्हाडांची पाठराखण...

तसेच दुसरीकडे मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता.त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडच्या चवदार तळ्यावर जात आंदोलन केलं होतं. मात्र, त्याठिकाणी त्यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडण्यात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे टिकेचे धनी ठरले होते.यावेळी देखील विरोधी गटाच्या आव्हाडांना भुजबळांनी साथ देत त्यांनी हे कृत्य मुद्दाम केले नसल्याचे सांगत त्यांच्याकडून चुकीने हे झाल्याचे म्हटले होते.याचवेळी त्यांनी या आंदोलनामागचा आव्हाडांचा उद्देश लक्षात घेण्याचेही आवाहन टीकाकारांना केले होते.

Sunil Tatkare On Chhagan Bhujbal
Kalyan Kale : जरांगेंच्या आंदोलनाला वडेट्टीवारांनी विरोध केला असेल तर ते चुकीचे....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com