Indapur Primary Co-operative Credit Society election : File Photo Sarkarnama
महाराष्ट्र

Co-Operative Elections: स्थगिती उठली, राजकारण पेटले! ‘गोकुळ’सह सहकार क्षेत्रात मोठी चुरस

Co-Operative Elections: न्यायालयानं स्थगिती दिलेल्या सहकारी संस्था वगळून उर्वरित ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या सर्व संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं उठवली आहे.

सरकारनामा ब्युरो

Co-Operative Elections: न्यायालयानं स्थगिती दिलेल्या सहकारी संस्था वगळून उर्वरित ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या सर्व संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं उठवली आहे. त्यामुळं राज्यातील ११ हजार ४१ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड अर्थात गोकूळच्या निवडणुकीसह इतर सर्वच निवडणुकांचा समावेश आहे. त्यामुळं नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं धुमशान सुरु होणार आहे.

प्राधिकरणानं नेमकं काय म्हटलंय?

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं काढलेल्या आदेशानुसार, अ व ब वर्गातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम ज्या टप्प्यावर स्थगिती देण्यात आली होती, तिथूनच पुढे या निवडणुका नियमातील तरतुदींप्रमाणं घेण्यात यावी. यासाठीचा प्रस्ताव संबंधित सहकारी संस्थांनी मान्यतेसाठी प्राधिकरणाकडं पाठवावा. तसंच अ, ब, क, ड या वर्गातील सहकारी संस्थांनी निवडणुकीसाठीच्या तात्पुरत्या मतदार याद्या तयार कराव्यात त्यासाठी १ फेब्रुवारी २०२६ हा कट ऑफ दिनांक देण्यात आला आहे. म्हणजेच या तारखेपर्यंतच्या मतदार याद्या ग्राह्य धरल्या जातील. या वर्षी ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यांच्यासाठी २४ फेब्रुवारी २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे.

वर्गनिहाय निवडणूक संख्या

यामध्ये सहकारी संस्थांच्या वर्गनिहाय निवडणुकांमध्ये ७४ 'अ' वर्ग सहकारी संस्था, १,३३३ 'ब' वर्ग सहकारी संस्था, ३,९४१ 'क' वर्ग सहकारी संस्था, ५,६९३ 'ड' वर्ग सहकारी संस्थांचा समावेश आहे. या सर्व मिळून ११,०४१ इतक्या सहकारी सस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT