Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणासाठी शरद पवारांचा खासदार मैदानात, जाहीर पाठींबा देत म्हणाले,'सरकारने...'

NCP SP Bajrang Sonawane : आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम आरक्षण कृती समिती समितीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला खासदार बजरंग सोनवणे यांनी पाठींबा दिला आहे.

Roshan More

Bajrang Sonawane News : मुस्लिम समाजाचे SEBC मधील पाच टक्के आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे मुस्लिम संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. मुस्लिम आरक्षण समितीकडून 17 एप्रिलला आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.

सोनवणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की,. महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षणाची मागणी ही अत्यंत न्याय व सामाजिक समानतेसाठी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या समितीच्या वतीने दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी बीड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मुस्लिम आरक्षण मोर्चास मी जाहिर पाठींबा व्यक्त करीत आहे.

मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या अध्यक्षांना खासदार सोनवणेंनी पाठीब्यांचे पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, समाजातील मागास वंचित घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. मुस्लिम समाजाच्या प्रश्नांकडे शासनाने तातडीने व सकारात्मक दृष्टीने पाहून ठोस निर्णय घ्यावेत, ही अपेक्षा व्यक्त करतो.

लोकशाही पद्धतीने, शांततामय मार्गाने आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा शासनाचे लक्ष वेधून घेईल व न्याय मागण्यांची पूर्तता होण्यास मदत करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. या आंदोलनास माझा संपूर्ण पाठिंबा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT