Ajit pawar, Sharad Pawar And Nilesh Lanke  sarkarnama
महाराष्ट्र

Nilesh Lanke : ...म्हणून निलेश लंकेंनी अजितदादांच्या आमदारकीवर पाणी सोडत शरद पवारांची राष्ट्रवादी जवळ केली

Nilesh Lanke Shares Political Journey Sarkarnama Interview : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांनी सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा डिजिटल विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा करताना शरद पवार यांच्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या.

Aslam Shanedivan

Ahilyanagar politics : राज्याच्या राजकारणात काही चेहरे यशाच्या शिखरावर गेले आहेत. यात कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या आणि आमदारी सोडून खासदार झालेल्या नीलेश लंकेंचे नाव येते. लंकेंच्या राजकीय प्रवासाची सुरूवात ही हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून झाली. पण ते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत. त्यांना राष्ट्रवादीनेच आमदार आणि खासदार केलं आहे. नुकताच झालेल्या विधानसभेला त्यांच्या पत्नीलाही राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट देत त्यांच्यारचा विश्वास दाखवला होता. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल काही गोष्टी सांगताना अजितदादांची राष्ट्रवादी सोडत शरद पवारांची साथ का दिली याचे कारण सांगितले आहे. ही माहिती त्यांनी सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा डिजिटल विशेष मुलाखतीत दिली आहे.

जेष्ठ नेते शरद पवार अनेकदा आपला प्रवास हा बाय कार करत असतात. यावरूनच नीलेश लंके यांनी शरद पवार असे का करतात? ते हेलिकॉप्टर-विमानातून का फिरत नाहीत याचे उत्तर दिलं आहे. याबाबतचा किस्सा सांगताना लंके यांनी, एकदा शरद पवार यांना त्यांच्या वयाचा दाखला देताना, या वयात तुम्हा बाय कारचा वापर न करता हेलिकॉप्टर-विमानातून फिरायला हवं, राज्याचे दौरे करायला हवेत. पण तुम्ही तर बाय कारच का जाता असा सवाल केला होता. या प्रश्नावर शरद पवार यांनी लंकेंना आपल्या बाजूला बसवत, या राज्याच्या राजकारणात आपण गेली 50 ते 55 वर्षे राजकारणात असून अनेक बदल घडवण्याचे प्रयत्न केलेत. त्या प्रयत्नांचा काय फलित झाला आणि कुठे अपयश आले याचे उत्तर बाय-कारमधून प्रवास करताना आपल्याला मिळत असल्याचे सांगितले

तसेच त्यावेळी शरद पवार यांनी आपल्याला गाडीत बसवून दौरा कसा करायचा असतो? कोणते प्रश्न लोकांसाठी महत्वाचे असतात याचा डेमोही दिला. त्यांनी मला, प्रवासा दरम्यान आपण दौऱ्याच्या ठिकाणी किंवा मध्ये कुठे थांबल्यास लोकांना काय विचारतो. ते बघ अशा सूचना केल्या होत्या. ते एखाद्या ठिकाणी उतरल्यास पहिला प्रश्न लोकांना विचारतात की त्यांच्या शेतात कोणता माल आहे. तो पिकवण्यासाठी पाणी आहे की नाही? पाण्याची स्थिती काय आहे? बाजारभाव काय आहे? तर जाता येता दोन्ही बाजूला शेतीसह इतर काय स्थिती आहे हे पाहत जातो. यामुळे आपण काय बदल केले आणि काय राहिले हे लक्षात येतं. तर आजची स्थिती पाहिली तर एखाद्या राजकीय नेत्याकडे थोडे पैसे आले की तो हेलिकॉप्टर-विमानातून फिरतो. पण शरद पवार आजही 99.99 टक्के प्रवास हा बाय-कार करतात. त्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांसाठी त्यांचा हा सल्ला मोलाचा असून मी ही बाय-कार प्रवासावर अधिक भर देत असल्याचेही ते म्हणालेत.

यावेळी नीलेश लंके यांनी मध्यंतरी शरद पवार यांच्या निवृत्तीवरून सुरू झालेल्या टीकेवरही भाष्य केलं आहे. मध्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्याबरोबर असणारे अनेक नेत्यांनी शरद पवार यांनी निवृत्ती घ्यावी असे म्हटलं होतं. पण त्यांचे आज वय काय आहे? हे महत्वाचे नसून त्यांच्यात आजही 20 ते 21 वर्षाच्या तरूणाला लाजवेल अशी उर्जा आहे. ते आजही 17- 18 तास काम करतात. यामुळे फक्त राज्यालाच नाहीतर त्यांची गरज या देशाला आहे. आम्ही त्यांच्याकडे असणाऱ्या उर्जेमुळे त्यांना जेष्ठ मानतच नाही. ते एक तरूण आणि लढवय्ये असल्याचेही लंकेंनी म्हटलं आहे

तसेच लंकेंनी अजित पवार यांच्याकडून आपण शरद पवार यांच्याकडे कसे आलो यावरून पडदा उठवताना सांगितले की, राष्ट्रवादी फुटली तो काळ वेदना देणारा होता. तो सर्वांसाठी वेदनादायी होत्या. त्यावेळी काही काळ आपण अजित पवार यांच्यासोबवत होतो. पण आपली एक भूमीका असते. त्या भूमीकेप्रमाणे मलाही आपल्या कुटुंबाची फाळणी व्हावी, दोन मतप्रवाह तयार व्हावीत असे वाटले नव्हते. पण सुरूवातीचा काळ आणि माघारी फिरण्याच्या कावधीत काही मन हेलावून टाकणाऱ्या गोष्टी घडल्या. ज्यामुळे मन आतून खात होतं.

पण काहिंनी वाटतं की लंके खासदाराकीसाठी थोरल्या पवारांच्या बरोबर गेला. पण जेव्हा राज्यात महाविकास आघाडी होती. तेव्हाही मला खासदारकीची ऑफर होती. त्याचवेळेला तशा सूचना होत्या. तर शरद पवार यांनीही तसा शब्द घेतला होता. त्याप्रमाणे आपणही शब्द दिला होता. जर तो शब्द पाळला नसता तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत याची सल मनात राहिली असता. ते दु:ख मनात राहिलं असतं. म्हणूनच राजकीय कारकिर्द पणाला लावून फक्त दिलेल्या शब्दासाठी खासदारकी लढल्याचे नीलेश लंके यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT