Ramdas Athawale Video : महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला सोबत घेण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र, राज ठाकरेंना महायुतीत घेऊन फायदा नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांची हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही मात्र त्यांचे स्वप्न भंग झाले, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज यांना लगावला.
आठवले म्हणाले, 'मी असताना महायुतीला राज ठाकरेंची गरज काय? या निवडणुकीत राज ठाकरेंनी हवा गेली. ते 143 जागा लढले त्यांना वाटले माझ्याशिवाय सत्ताच येणार नाही पण त्यांचे स्वप्न भंगले. राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात लोक ऐकायला येतात आणि निघून जातात. त्यांना मत देत नाहीत.राज ठाकरे महायुतीत येतील अस मला वाटत नाही.'
महादेव जानकर हे आमच्यासोबत महायुतीमध्ये होते ते शरद पवारांना जाऊन भेटले तर त्यांना परभणीची जागा सोडण्यात आली. मी शरद पवारांना जाऊन भेटलो असतो तर मलाही शिर्डीची जागा मिळाली असती, असे रामदास आठवले म्हणाले.
महादेव जानकर हे आमच्यासोबत महायुतीमध्ये होते ते शरद पवारांना जाऊन भेटले तर त्यांना परभणीची जागा सोडण्यात आली. मी शरद पवारांना जाऊन भेटलो असतो तर मलाही शिर्डीची जागा मिळाली असती, असे रामदास आठवले म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर महायतुमध्ये मंत्रिपदांबाबत चर्चा सुरू आहे. रिपब्लिकन पार्टीला मंत्रिपद मिळणार की नाही यावर देखील रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आम्हाला मंत्रिमंत्रिपद मिळणारच नाही त्यामुळे आम्ही कोणत्याही खात्याची मागणी केलेली नाही.
EVM वर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातो आहे. त्यावरून आठवलेंनी विरोधकांना सुनावले आहे. विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये. लोकसभेला ईव्हीएम खराब आहेत असं आम्ही म्हणालो का? त्यांनी पराभव मान्य केले पाहिजे. ईव्हीएम मशीन हे तुम्हीच आणली पुन्हा पेपरवर निवडणुका घायच्या की नाही हे निवडणूक आयोग ठरवेल असे देखील आठवले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.