Maharashtra Loksabha Constituency News Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Loksabha Constituency : शिंदे गटाच्या तेरा खासदारांना मिळणार उमेदवारी, इतर मतदारसंघांत काय ?

Shivsena News : ठाकरे गटाचे खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघांबाबत मात्र वेट अॅन्ड वाॅच ची भूमिका भाजपने घेतल्याचे समजते.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १३ खासदारांची नुकतीच तब्बल चार तास बैठक घेतली. (Shivsena News) या बैठकीत या सर्व विद्यमान खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आदेश त्यांनी दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपल्या उमेदवारी मिळणार की नाही? या चिंतेत असलेल्या सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

भाजपने त्यांच्याही मतदारसंघावर दावा सांगितल्यामुळे हे सगळे खासदार हवालदिल झाले होते. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच तयारी लागा सांगितल्यामुळे (Eknath Shinde) शिंदे गटाचे खासदार आपापल्या मतदारसंघात जोमाने कामाला लागले आहेत. (Shivsena) दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार असलेल्या ९ लोकसभा मतदारसंघांतही आपणच लढणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले असले तरी अद्याप याबाबत स्पष्टता दिसत नाही.

बहुदा सध्या जितके विद्यमान खासदार आहेत, त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ, असा शब्द भाजपकडून शिंदे गटाला मिळाला असावा. (Maharashtra) राहिला प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार असलेल्या मतदारसंघांचा, तर कदाचित भाजप या ठिकाणी स्वतः लढू शकते, अशी चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत सर्व ४८ मतदारसंघांत तयारीला लागा, अशा सूचना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे अजूनही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ४८ मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या वाट्याला नेमक्या किती जागा येतात हे स्पष्ट नाही. भाजपचे धक्कातंत्राचे राजकारण पाहता तावडे यांनी कार्यकर्त्यांना राज्यातील सगळ्या मतदारसंघात तयारीला लागा, असा दिलेला संदेश बराच सूचक आहे. शिंदे गटाने त्यांच्या खासदारांची बैठक घेत तयारी सुरू केली आहे.

भाजप दोन वर्षांपासून तयारीला लागला आहे, तर अजित पवार गटाकडे सुनील तटकरे सोडले तर दुसरे खासदार नाहीत. प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर आहेत. त्यामुळे अजित पवार गटात लोकसभेच्या दृष्टीने सध्या तरी फारशा हालचाली होताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ खासदारांना उमेदवारीचा शब्द बहुदा भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींकडून मिळवला असावा. ठाकरे गटाचे खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघांबाबत मात्र वेट अॅन्ड वाॅचची भूमिका भाजपने घेतल्याचे समजते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT