Mumbai News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या पेपरफुटी प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एमपीएससीच्या ३ अधिकाऱ्यांसह क्लासचालक आणि विद्यार्थ्याच्या नातेवाइकांचा समावेश आहे. तर या प्रकरणात एमपीएससीच्या अव्वर सचिवालाही अटक करण्यात आली आहे. एमपीएससीच्या अव्वर सचिवासह दोन सहायक कक्ष अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. या अटकेनंतर आता एकच खळबळ उडाली आहे.
पेपरफुटी झाल्यानंतर एमपीएससीने औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन विभागाची परीक्षा रद्द केली आहे. तर हे प्रकरण प्रेमप्रकरणातून झाल्याचा दावा केला जात आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू झाला असून, या पेपरफुटीमागचा "आका" कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.
आता पेपरफुटीच्या गैरप्रकारानंतर सरकारने परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना अंशतः दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या पेपरफुटी प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली असून, यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अव्वर सचिवासह दोन सहायक कक्ष अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पेपरफुटी प्रकरणात अव्वर सचिव अभिजीत लेंडवे यांना गुन्हे शाखेने अटक केली असून, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेवर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे. परीक्षार्थी ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि पेपरफुटीतला सूत्रधार प्रवीण पाटील या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच पेपरफुटीचा आरोप करणाऱ्या गौरव पाटीलला देखील अटक करण्यात आली नाही.
या पेपरफुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल कमी झाले असून, दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी संताप व्यक्त करत केली आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि विद्यार्थी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा करत तक्रार केली होती.
या तक्रारीवरूनच मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण सोपवण्यात आले होते. तर केलेल्या प्राथमिक चौकशीत २० मार्च २०२६ रोजी काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले होते. यानंतर आता राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन विभागाची परीक्षा रद्द केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.