MPSC Exam cancelled : MPSC ने घेतलेली परीक्षा रद्द, सुषमा अंधारेंच्या 'त्या' दोन प्रश्नांनी सरकारची अडचण; म्हणाल्या, 'नेमकं कोण...'

Sushma Andhare Shivsena UBT MPSC : एमपीएससीने अन्न व औषध प्रशासनाची घेतलेली परीक्षा रद्द केली आहे. परीक्षेचा पेपर फुटल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या सुषमा अंधारेंनी आता या कारवाईनंतर देखील दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहे.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन पदाची भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आले आहे. या निर्णयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारसमोर काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागातील सरळसेवा भरतीसाठी २२ मार्च रोजी होणारा पेपर २० मार्चलाच फुटल्याचे आपण पुराव्यांसह निदर्शनास आणून दिले होते, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअॅप चॅट आणि इतर पुरावेही समोर आणण्यात आले होते. त्यानंतर आता सरकारने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

फेरपरीक्षेच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना काही अंशी न्याय मिळत असल्याचे समाधान आहे. मात्र, या प्रकरणातील दोन महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत, असे अंधारे म्हणाल्या.

‘पेपर फुटलाच कसा?’

पेपर फुटला असेल तर तो फोडणारे कोण आहेत? पेपरफुटीमागे नेमके कोण जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार? याबाबत सरकारने अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.

याशिवाय फेरपरीक्षेमुळे काही विद्यार्थ्यांना वयोमर्यादेचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी सरकार कोणता मध्यममार्ग काढणार, हा देखील महत्त्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sushma Andhare
MPSC recruitment cancelled : राहुल गांधींच्या कार्यक्रमात MPSC पेपरफुटीचा मुद्दा; अवघ्या 72 तासांत औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरतीच रद्द

सरकारने भूमिका स्पष्ट करावी...

केवळ फेरपरीक्षा घेऊन प्रश्न सुटणार नाही; पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई आणि वयोमर्यादेमुळे बाधित होणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देणे, या दोन्ही बाबींवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.

Sushma Andhare
MPSC Paper Leak : CM फडणवीसांवरचे आरोप हर्षवर्धन सपकाळांना भोवणार; भाजप आमदाराचा कायदेशीर कारवाईचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com