Sushma Andhare News : एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेप्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावर दबाव आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी त्याचे बोलणे झाले होते.मात्र, आता त्याचा फोन बंद आहे. त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, 'सहा दिवसांपूर्वी त्या मुलाचा फोन चालू होता. आता अचानक त्याचा फोन बंद येतो आहे. याचा अर्थ काय? त्यावर दबाव आणताय का? त्याला घाबरवत आहात का? आम्ही त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो म्हणतोय की मला दुसऱ्या परीक्षेला बसूनच देणार नाहीत.'
दरम्यान, गुणपत्रिका आणि अंतिम निवड यामध्येही विसंगती असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावे यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला नाही, असे स्पष्ट मत एमपीएससी ने दिलं आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे या आरोपात संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एमपीएससी कडून त्याची पडताळणी केली जाणार आहे. एमपीएससीची ने सर्व आरोप फेटाळून लावले असून परीक्षा एक महिन्यापूर्वी झाले निकालही लागल्याचे म्हटले आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल मात्र यात जर तथ्य नसेल तर अफवा पसरवण्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा एमपीएससीने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.