TET Exam : पेपरफुटीवर खासदार भगरे गुरुजी संतप्त : विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी!

Nashik NCP Bhaskar Bhagre TET & MPSC 2026 offline exam deemands CM Devendra Fadnavis-टीईटी परीक्षा पेपर फुटीचा प्रश्न तापला, खासदार भास्कर भगरे यांनी सुचवला वेगळाच पर्याय
mp_Bhaskar_Bhagare
mp_Bhaskar_BhagareSarkarnama
Published on
Updated on

TET Exam News : नीट पाठोपाठ महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचा पेपर फुटला. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी विधिमंडळात शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे पेपर फुटीचा प्रश्न सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी निमित्त ठरण्याची चिन्हे आहेत.

या प्रश्नावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वतः शिक्षण क्षेत्राशी आणि शिक्षकांची निगडित असल्याने भगरे या विषयावर चांगलेच आक्रमक आहेत. त्यांनी या प्रश्नावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांसह सर्वच संबंधितांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. 

या संदर्भात खासदार भगरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा एक पर्याय समोर आला आहे. हा पर्याय म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना संकटात टाकणारा असल्याचे त्यांनी सांगितले. 

mp_Bhaskar_Bhagare
TET Paper Leak : शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या विरोधात वंचित आक्रमक; तात्काळ राजीनामा देण्याची मागणी, सुजात आंबेडकर मैदानात!

शासनाने यंदाची टीईटी परीक्षा तसेच यंदाची व पुढील वर्षाची राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑफलाइन घ्याव्या. यामध्ये कोणताही बदल करू नये. तसा बदल करणे विद्यार्थी आणि पालकांना संकटात टाकणारा ठरेल असे म्हटले आहे 

mp_Bhaskar_Bhagare
Paper Leak : '7 लाख विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी ओतले? शिक्षणमंत्री राजीनामा द्या', शिक्षक आमदाराने फडणवीस सरकारला झोडपले

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५ जून २०२६ ला प्रसिद्ध केलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा गट क २०२६ या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी नाराज झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये चिंतेची स्थिती असून अनेक अडचणी निर्माण होणार आहेत.

ऑनलाइन परीक्षेमुळे उमेदवारांना त्यांच्या निवासस्थानापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या परीक्षा केंद्रावर जावे लागेल. त्यांच्या प्रवास निवास आणि अन्य व्यवस्थेसाठी मोठा आर्थिक खर्च आणि वेळेचा अपव्य होईल. विशेषता ग्रामीण आणि दुर्गम भागातील तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसेल. त्यातून विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक तणावालाही सामोरे जावे लागेल. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेचा पर्याय तातडीने रद्द करावा अशी मागणी खासदार भगरे यांनी केली. 

ऑनलाइन परीक्षेमध्ये वापरण्यात येणाऱ्या सामान्यीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने शंका आणि अविश्वास राहिला आहे. वेगवेगळ्या शिफ्ट मधील प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेत फरक, तांत्रिक अडचणी आणि सर्वर डाऊन होणे तसेच संगणक प्रणालीवर पूर्णतः अवलंबून राहणे असे अनेक दोष आहेत. त्याकडे खासदार भगरे यांनी शासनाचे लक्ष वेधले. 

शासनाने यंदाची टीईटी परीक्षा तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी. ऑनलाइन परीक्षेच्या चर्चेने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तणावाची स्थिती आहे. राज्य शासनाचे परीक्षा आणि विद्यार्थ्यांसंदर्भात धरसोड धोरण योग्य नाही असेही ते म्हणाले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com