MPSC Exam Reform Latest News : MPSC परीक्षांच्या पद्धतीबाबत सुरू असलेला गोंधळ आणि विद्यार्थ्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
दरम्यान, आज पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली असून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. परीक्षा पद्धतीतील बदल, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी MPSC परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्याबाबत विविध मागण्या मांडण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सूचनांचा विचार करूनच पुढील सुधारणा केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीत UPSCचे माजी सदस्य, पोलिस महासंचालक, IIT मधील प्राध्यापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे समिती राज्यातील विविध भागांमध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहे. पुण्यातही विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जाणार आहेत.
पेपरफुटीच्या घटनांबाबतही सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. परीक्षा व्यवस्थेतील कोणत्याही व्यक्तीचा गैरप्रकारात सहभाग आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.
एमपीएससी परीक्षा पद्धती संदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळाने मुंबई येथे भेटले. यावेळी शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते.
आता या समितीच्या शिफारशी काय असतील, MPSC परीक्षा पद्धतीत नेमके कोणते बदल होणार आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.