BJP VS MNS : अडीच वर्षांनी पुन्हा आमदार होणार, राजू पाटलांचा दावा; मनसेचा भाजपला धक्का, 'त्या' कार्यकर्त्यांची घरवापसी!

Raju Patil Politics KDMC : राजू पाटील यांनी आपण पुन्हा अडीच वर्षांनी आमदार होणार असल्याचा दावा केला आहे. मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा मनसेत प्रवेश केला.
Raju Patil Politics KDMC
Raju Patil Politics KDMCsarkarnama
Published on
Updated on

MNS News : मनसेने भाजपला जोरदार धक्का देत मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या कल्याण-डोंबिवलीमधील अनेक कार्यकर्त्यांची घरवापसी केली. अल्पावधीतच झालेल्या या ‘घरवापसी’मुळे भाजपला स्थानिक पातळीवर राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच एसआयआरच्या आकडेवारीमुळे बोगस मतदान झाल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत अडीच वर्षांनी आपण पुन्हा आमदार होणार, असा दावा मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप करत पाटील यांनी आता थेट आगामी निवडणुकीवर नजर रोखली आहे. विशेष म्हणजे, भाजपमध्ये गेलेल्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काही दिवसांतच मनसेत ‘घरवापसी’ केल्याने संघटनात्मक ताकद दाखवत राजू पाटील यांनी ‘पराभवाची खंत नाही, पुढची लढाई जिंकायचीच’ असा राजकीय आत्मविश्वास व्यक्त केला.राजू पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

राजू पाटील म्हणाले, “2024 मध्ये बोगस मतदान झाले, हे आम्हाला सर्व समजत होते; मात्र त्यावेळी काही करता आले नाही. आगामी काळात एसआयआरच्या कामावर कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे. एसआयआरमध्ये 50 टक्के मतदार कमी झाले आहेत. बोगस मतदारांमुळे आपला पराभव झाला होता. आता SIR वर काम करा. अडीच वर्षांनंतर मी पुन्हा आमदार होणार आहे,” असा दावा केला.

Raju Patil Politics KDMC
PMC Ward Committees : भाजप कार्यकर्त्यांना पुणे महापालिका आयुक्तांचा मोठा धक्का, नियुक्तीचं स्वप्न हवेतच विरलं

मनसेकडून मोर्चेबांधणीला सुरुवात

पाटील यांच्या या विधानामुळे मनसेने आतापासूनच पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. अशा परिस्थितीत पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मनसेकडून स्थानिक पातळीवर पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पक्षप्रवेशावेळी कार्यकर्ते सांगत होते.

Raju Patil Politics KDMC
Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंनी व्यक्त केली मोठी भीती; म्हणाले, 'पोरं जातील...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com