MPSC Exam  Sarkarnama
महाराष्ट्र

MPSC Exam : 'MPSC'चा धडाकेबाज निर्णय; आता परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार दीड तास आधी, वेळेनंतर पोहचणाऱ्यांना…

MPSC Exam 2026 Major Rule Change : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच झालेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेमध्ये एका दिवसात उत्तर तालिका जाहीर केली.

Aslam Shanedivan

MPSC Strict Guidelines News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकताच नागरी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तर एका दिवसात उत्तर तालिका जाहीर करण्याचे काम आयोगामार्फत झाले होते. ज्याची राज्यभर चर्चा झाली. पण आता महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी आयोगाने मोठा निर्णय घेतला असून नियमही कडक केला आहे. या निर्णयाप्रमाणे आता उमेदवारांना दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार आहे.

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, दिनांक १४ जून २०२६ राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर होणार असून त्याआधी आयोगाने आपल्या नियमात बदल केले आहेत. दरम्यान या परीक्षेकरीता उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

तर आयोगाने एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार असा नियम केला आहे. तसेच परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असेल. ते नसल्यास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

तसेच परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्धभवणाऱ्या अडचणी, इतर समस्या किंवा अतिवृष्टी या गोष्टी लक्षात घेऊन परीक्षा केंद्रावर किमान दीड तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

तर या वेळेनंतर जर कोणी तेथे पोहचल्यास त्याला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश नाकारला जाणार जाईल. यासाठी कोणत्याही प्रकारची जबाबदारी आयोगाची राहणार नाही असेही बजावण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT