MPSC question paper security protocol debate Sarkarnama
महाराष्ट्र

MPSC Exam : धक्कादायक! वेळेआधीच उघडली जाते MPSC ची प्रश्नपत्रिका? नव्या दाव्यांमुळे खळबळ, एका चुकीच्या नियमामुळे…

MPSC question paper opened before exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच झालेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता.

Aslam Shanedivan

MPSC exam security concerns in Maharashtra: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी मोठा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे आता उमेदवारांना दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार आहे.

ज्याची राज्यभर जोरदार चर्चा झाली. पण आता याच परीक्षेच्या आधी आयोगाच्या एका चुकीच्या नियमामुळे एमपीएससीची प्रश्नपत्रिका वेळेआधीच उघडली जाते असा दावा केला जत आहे. या नव्या दव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, दिनांक १४ जून २०२६ राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर होणार असून त्याआधी आयोगाने आपल्या नियमात बदल केले. उमेदवारांना आता दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार आहे. दरम्यान या परीक्षेकरीता उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

आता प्रत्यक्ष परीक्षेला फक्त तीन दिवस उरले असताना नव्या दव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. लोकसत्तातील वृत्तानुसार आयोगाच्या नियमातील एका चुकीमुळे तीन मिनीटांआधी एमपीएससीचा पेपर उघड जातो असे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे यामुळेच अनेकदा पेपर फुटत असल्याची चर्चा आहे. तर यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण तयार होताना दिसत आहे.

नेमका गोंधळ काय?

एमपीएससीच्या परीक्षेत पेपरच्या वेळी प्रत्येक उमेदवाराला तीन मिनिटे अगोदरच प्रश्नपत्रिका दिली जाते. हा वेळ उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिकेचा क्रमांक टाकण्यासाठी असतो. पण बहुतांश उमेदवार या वेळेत सूचनांचे पालन न करता प्रश्नपत्रिकेचे ‘सील’ उघडून प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करतात.

ज्याचा थेट फटका काटेकोरपणे सूचनांचे पालन करणाऱ्या उमेदवारांना बसतो. पेपर सुरू होण्याची घंटा होते तेव्हाच ते प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करतात. तर जे सूचनांचे पालन करत नाहीत अशांना अधिकचा तीन मिनिटांचा वेळ मिळतो.

तसेच याच कालावधीत पेपर देखील फुटण्याची दाट शक्यता निर्माण होते. यामुळे आता आयोगाने काटेकोरपणे वेळेतच प्रश्नपत्रिका देत त्या वेळेतच प्रश्नपत्रिकेचे सील उमेदवारांनी फोडावे याबद्दल कडक कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT