MPSC Paper Leak  Sarkarnama
महाराष्ट्र

OSD Ganesh Deore : MPSC पेपर फुटीच्या कनेक्शनचा आरोप, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा OSD आला समोर, स्पष्टच सांगितले, 'माझा संबंध...'

MPSC Paper Leak Narhari Zirwal : मंत्री नरहरी झिरवळ यांचे ओएसडी गणेश देवरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्यावर होणार आरोप फेटाळले असून थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Roshan More

MPSC News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचे धागेदोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्री कार्यालयापर्यंत पोहोचल्या संशय व्यक्त केला जात होता.

काही माध्यमांनी झिरवळ यांचे ओएसडी गणेश देवरे गायब असल्याचे वृत्त दिले होते. पेपरफुटीच्या संदर्भात तक्रार देणाऱ्या गौरव पाटील यांच्या नंदुरबारमधील घरात देवरे हे भाडेकरू आहेत. त्यामुळे वेगवेगळे आरोप केले जात होते. मात्र, देवरे हे समोर आले असून माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ते म्हणाले, 'लोकसेवा आयोग आणि मंत्रालयीन विभाग यांचा कुठलाही संबंध नाही. मी मुंबईला असताना माझा परिवार येथे (नंदूरबार) येथे राहतो. आणि मी येथून ये जा करत असतो. हा केवळ योगायोग आहे की, तक्रारदार गौरव पाटील यांच्या घरात मी भाड्याने राहत आहे.'

'माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही. मी राहत आहे, यामध्ये माझी चूक आहे का? ही विचार करणाऱ्या सारखी बाब आहे. मी येथे राहतो हा केवळ योगायोग आहे. जर काही असतं तर माझी चौकशी झाली असती. सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्याच्यामध्ये काही असते तर माझी चौकशी झाली असती.'

'या प्रकरणात चौकशी सुरू होऊन अनेक दिवस झाले आहेत. मात्र मला चौकशीला फोन देखील आला नाही. किंवा चौकशी देखील झाली नाही. कारण माझा कुठेही संबंध नाही. संबंध येण्याचा प्रश्न देखील नाही कारण ही परीक्षा लोकसेवा आयोग घेतं. जो काही पेपर फुटला जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल.', अस देखील ते म्हणाले.

कायदेशी कारवाई करणार...

गौरव पाटीलच्या घरात मी भाडेकरू म्हणून राहत असेल तर यामध्ये माझा काय दोष आहे. याच्यामुळे मीडिया ट्रायल करून माझी बदनामी सुरू आहे. काही मीडीया माझं नाव घेत आहे, माझं रेकाॅर्डिंग वापरत आहे, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई देखील करणार आहे. माझं वकिलांशी बोलणं देखील झालं आहे, असे देखील गणेश देवरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT