MPSC Exam  Sarkarnama
महाराष्ट्र

MPSC Latest News : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलल्या

MPSC Rajyaseva 2025 Interview Schedule Changed : राज्यातील पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा २०२५च्या मुलाखतींबाबत मोठा निर्णय घेत त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Aslam Shanedivan

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा २०२५च्या मुलाखती पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. याबाबत ‘सकाळ’ने बुधवारीच वृत्त प्रसिद्ध केले होते. तर या वृत्तातून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ च्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला संशय आणि राज्यसेवा २०२५ मुलाखतींबाबतची अनिश्चिततेवर प्रकाश टाकण्यात आला होता.

तर मुख्य परीक्षा पुढे ढकलून नव्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कायम आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर, फेरतपासणी होईपर्यंत आयोगाला सांगून मुलाखती थांबविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

मात्र, आयोगाकडून अधिकृत परिपत्रक न आल्याने २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान नियोजित असलेल्या मुलाखतींबाबत विद्यार्थ्यांमध्ये द्विधा मनःस्थिती होती. ‘मुलाखतीची तयारी करायची की मुख्य परीक्षेचा अभ्यास?’ असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता.

दरम्यान आता या बातमीची दखल घेत आयोगाने बुधवारी अधिकृत प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध करत २१ ते २४ आणि २६ व २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित केलेला मुलाखत कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच, सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

‘राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६’बाबत अस्पष्टता

राज्यसेवा २०२५ च्या मुलाखतींचा प्रश्‍न सुटला असला, तरी तीन ऑक्टोबर ते एक नोव्हेंबरदरम्यान नियोजित असलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत अद्याप अस्पष्टता कायम आहे. परीक्षेचे पेपर साधारण दोन महिने आधीच सेट केले जातात.

आयोगाचे निलंबित अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्या वादग्रस्त कार्यकाळातच आगामी मुख्य परीक्षेचे पेपर तयार झाल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रक्रियेतही गैरप्रकार झाला नसेल कशावरून? त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलून नव्या प्रश्नपत्रिकांसह परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत केवळ परीक्षा नियोजित वेळेत घेणे महत्त्वाचे नसून परीक्षेच्या प्रक्रियेबाबत उमेदवारांच्या मनात पूर्ण विश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे संशयाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान प्रश्नपत्रिका रद्द करून नव्याने प्रश्नपत्रिका तयार कराव्यात. त्यासाठी आवश्यक असल्यास मुख्य परीक्षा पुढे ढकलावी.
- भारत पांडव, विद्यार्थी
सध्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास डळमळीत झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील हा संशय दूर करण्यासाठी आयोगाने यापूर्वी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका रद्द करून नव्याने प्रश्नपत्रिका तयार कराव्यात. नव्या प्रश्नपत्रिका तयार होईपर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
- हितेश तवाडे, विद्यार्थी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT