MPSC Students Protest Pune Sarkarnama
महाराष्ट्र

MPSC Students Protest Pune : ‘आयोगराव, पेपर फुटणे हा हलकटपणा’; पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

MPSC students protest in Pune over paper leak allegations, with striking posters demanding accountability : अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी; ‘आयोगराव, पेपर फुटणे हा हलकटपणा आहे’पासून ‘मुंबई-टू-जेल’पर्यंत पोस्टरबाजी चर्चेत

Pradeep Pendhare

MPSC students protest Pune : स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध प्रश्नांवर आणि न्यायासाठी MPSC चा अभ्यास करणारे हजारो विद्यार्थ्यांनी पुण्यात धडक मोर्चा काढला. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय निघालेल्या या मोर्चात, विद्यार्थ्यांनी पेपर फुटीवरून MPSC चे अध्यक्ष अन् सचिवांना थेट टार्गेट करत राजीनाम्याची मागणी केली.

या मोर्चाला राजकीय पाठिंबा वाढला आहे. या मोर्चात विद्यार्थ्यांनी झळकवलेले पोस्टरांनी सत्ताधाऱ्यांची झिंग उतरल्याची चर्चा होती. मोर्चातील उपहासात्मक पोस्टर राज्यात चर्चेचा विषय ठरला असताना, सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. MPSC च्या कारभारावर विद्यार्थ्यांचा हा रोष म्हणजे, एकप्रकारने सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर थेट प्रश्नच आहे, असा सूर सत्ताधाऱ्यांविरोधात राजकीय विरोधकांनी अळवला आहे.

MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या नावाने सर्वाधिक पोस्टर मोर्चात होते. 'बोर्डिंग पास फस्ट क्लास' नावाचा पोस्टर सर्वाधिक लक्षवेधी होता. या पोस्टरावर विवेक भीमनवार यांना मुंबई-टू-जेल बहुज जल्दी, असा खोचक टोला लगावला आहे. MPSC चा औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीत ऋतुजा हिच्यावर आरोप झाले आहेत. तिच्या नावाने 'थँक्यू ऋतुजा' असा उपरोधिक टोला लगावणारा पोस्टर झळकले होते.

राजकारण्यांवर टोलेबाजी करणारे पोस्टर देखील या मोर्चात विद्यार्थ्यांनी (Student) झळकले. यांना परीक्षा घ्या म्हणून मागे लागायचं, जागा काढा म्हणून मागे लागायचं, पेपर फुटले आम्ही सांगायचं, पुरावे आम्हीच द्यायचे, तुम्हाला नुसतं पेपर आणि आमदार फोडायला बसवलं का? आता तर राजीनामा झाला पाहिजे, असा घणाघात देखील पोस्टरमधून आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे.

'कुचू-पुचू झाली भारी, आता करा राजीनाम्याची तयारी', 'भीमनवार काका, तुम्ही पेपरचोर आहात', असे म्हणत MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना लक्ष केले आहेत. अभिनेता अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर अभिनीत, 'अशी ही बनवाबनवी', या चित्रपटातील पोस्टरवर, 'पेपर फुटणे हा हलकटपणा आहे, आयोगराव', असे पोस्टर पाहून हसू फुटल्याशिवाय राहत नव्हते.

टाईमपास नव्हता तो...

अभिनेता वैभव मांगले यांच्या टाइमपास चित्रपटातील फोटो घेऊन, 'प्यापर गळपाटला, MPSC चा राजीनामा झाला पाहिजे', असेही पोस्टर हस्याच्या श्रेणीत नेत होते. टाइमपास चित्रपटातील आणखी फोटो घेऊन त्यावर, 'टाईमपास नव्हता तो, आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा पेपर होत तो', हा सीरीयस पोस्टर लक्ष वेधून घेत होता.

माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम...

'लग्नं ठरलं होतं, आयोगाने मोडलं', 'फेंड्स... पेपर फुटला', 'बोला काय पाहिजे, या पोस्टरवर वेगवेगळ्या पदांचा उल्लेख करत, त्यावर किंमती लिहिल्या होत्या. 'बेटा तुमसे ना हो पायेगा', 'इथिक्स हमारे घोडे पे', 'ब्रेकअप.., माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम तूच होतीस MPSC अशी का वागलीस?', अशा वेगवेगळ्या पोस्टरांनी MPSC च्या कारभाराच्या चिंधाड्या उडवल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT