ST NEWS : राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली असून ही दरवाढ आज रात्रीपासून लागू होणार आहे.
डिझेल, सुटे भाग, टायर, देखभाल खर्च तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वी लागू करण्यात आलेली साध्या बससेवेवरील १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून राज्य परिवहन प्राधिकरणाने ही भाडेवाढ मंजूर केली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, भाडेवाढ निश्चित करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार प्रवासी सेवा सातत्याने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विश्वास कायम ठेवावा, असे आवाहनही देखील सरनाईक यांनी केले आहे.
बससेवेवरील १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे त्याचे स्वागत करतानाच एसटीने आता १३.५६ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णयावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रवासी संघटना देखील या भाडेवाढीमुळे नाराज आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.