Mumbai News: एकीकडे राज्यात मराठवाडा,विदर्भ,उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीचा फटका बसलेला असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळानं तिकीटांच्या दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. ही हंगामी दरवाढ असून दिवाळीच्या काळात ही तिकीट दरवाढ लागू होणार होती. राज्यात महापुराचा तडाखा बसलेला असल्यामुळे एसटी महामंडळाच्या भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पण आता एसटी महामंडळावर हा भाडेवाढीचा निर्णय दुसऱ्याच दिवशी रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Prarap Sarnaik) यांनी बुधवारी(ता.1 ऑक्टोबर) हा भाडेवाढ रद्दचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर ही दरवाढ मागे घेतली असल्याचंही सरनाईक यांनी यावेळी नमूद केलं आहे.या भाडेवाढीची घोषणा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर करण्यात आली होती. पण 24 तासांच्या आतच ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीसाठी करण्यात आलेली एसटीची भाडेवाढ तत्काळ रद्द करण्याच्या सूचना केल्या होत्या. महाराष्ट्रातील सध्याची पूरपरिस्थिती पाहून ही भाडेवाढ रद्द करावी असे शिंदे यांनी महामंडळाला सुचविले होते. त्यावर प्रताप सरनाईक यांनी ही भाडेवाढ रद्द करण्याचे एसटी प्रशासनाला (ST Department) आदेश दिले आहेत.
दिवाळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड मोठी आहे.पण एसटीकडून राज्यात पूरस्थितीची परिस्थिती असतानाही हंगामी 10 टक्के भाडेवाढ करण्यात आल्यामुळे मोठी नाराजी पसरली होती. सर्वसामान्य जनतेला या प्रस्तावित भाडेवाढीचा फटका बसणार होता.
एसटी परिवहन महामंडळासाठी दिवाळीचा सिझन अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात एसटीला मोठ्या प्रमाणावर प्रवाशी संख्या लाभते. दरवर्षी एसटी महामंडळाकडून ही हंगामी भाडेवाढ काही मर्यादित काळासाठी करण्यात येत असते. एसटी महामंडळानं हंगामी 10 टक्के भाडेवाढ केल्यानंतर 'सरकारनामा'नं या निर्णयाविरोधात सर्वात पहिल्यांदा आवाज उठवला होता.
यंदा दिवाळी 18 ते 23 या सहा दिवसांच्या काळात असणार आहे.या पार्श्वभूमीवर दिवाळी सुरु होण्यापूर्वी जनतेची गावाकडं परतण्याची लगबग असते तसंच दिवळी संपल्यानंतरच्या काळात पुन्हा शहरांमध्ये जाण्याची घाई असते.त्यामुळं यंदा 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात एसटीची दरवाढ लागू असणार आहे.यामध्ये लक्झरी शिवनेरी आणि शिवाई या बसेसला भाडेवाढ नसणार पण इतर सर्व एसटींना ही भाडेवाढ लागू असणार आहे.
राज्यात यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळं ग्रामीण भागातील जनतेचं कंबरडं मोडलं आहे. त्यांची पिकं, घरं, जनावरं असं सगळं काही उद्ध्वस्त आणि नष्ट झालं आहे. त्यामुळं यंदाची दिवाळी ही त्यांच्यासाठी निश्चितच आनंदाची दिवाळी असणार नाही. त्यातच हातात पैसाही नसल्यानं दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी खरेदी आणि फराळासारख्या गोष्टींवर खर्च करणंही त्याला अशक्य असणार आहे. त्यातच एसटीनं भाडेवाढ केल्यानं त्याचाही भुर्दंड ग्रामीण भागातील जनतेवरच पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.