ST Ticket Hike: महापुरानं ग्रामीण जनता त्रस्त त्यात एसटीनंही सोडली माणुसकी! दिवाळीला गावी जाण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

ST Ticket Hike: राज्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
S.T. Bus
S.T. BusSarkarnama
Published on
Updated on

ST Ticket Hike: राज्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीचा फटका बसला आहे. महापुरात ग्रामीण भागातील जनता त्रस्त झालेली असताना त्यातच आता एसटी महामंडळानं तिकीटांच्या दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही हंगामी दरवाढ असून दिवाळीच्या काळात ही तिकीट दरवाढ लागू असणार आहे.

S.T. Bus
Sharad Pawar: संघर्षात पवारांकडून नाशिकची निवड! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिला मेळावा, यशस्विनी अभियान ते आक्रोश मोर्चा

कुठल्या काळात भाडेवाढ लागू?

कामधंद्यानिमित्त शहरांमध्ये आलेली ग्रामीण भागातील जनता दिवाळीच्या सणासाठी गावी परतत असते, त्यामुळं एसटीला मोठ्या प्रमाणावर प्रवाशी संख्या लाभते. हा काळ म्हणजे एसटीचा सिझनचा काळ असल्यानं या आठवड्याभरासाठी एसटीकडून दरवर्षी हंगामी दरवाढ करण्यात येते. यंदा दिवाळी १८ ते २३ या सहा दिवसांच्या काळात असणार आहे. यापार्श्वभूमीवर दिवाळी सुरु होण्यापूर्वी जनतेची गावाकडं परतण्याची लगबग असते तसंच दिवळी संपल्यानंतरच्या काळात पुन्हा शहरांमध्ये जाण्याची घाई असते. त्यामुळं यंदा १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात एसटीची दरवाढ लागू असणार आहे. यामध्ये लक्झरी शिवनेरी आणि शिवाई या बसेसला भाडेवाढ नसणार पण इतर सर्व एसटींना ही भाडेवाढ लागू असणार आहे.

S.T. Bus
Prithviraj Chavan And Radhakrishna Vikhe case : पृथ्वीराज चव्हाण अन् मंत्री विखेंविरोधात दंगलीचा गुन्हा..; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, नेमकं काय आहे प्रकरण?

ग्रामीण भागातील जनतेवर भुर्दंड

दरम्यान, राज्यात यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळं ग्रामीण भागातील जनतेचं कंबरडं मोडलं आहे. त्यांची पिकं, घरं, जनावरं असं सगळं काही उद्ध्वस्त आणि नष्ट झालं आहे. त्यामुळं यंदाची दिवाळी ही त्यांच्यासाठी निश्चितच आनंदाची दिवाळी असणार नाही. त्यातच हातात पैसाही नसल्यानं दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी खरेदी आणि फराळासारख्या गोष्टींवर खर्च करणंही त्याला अशक्य असणार आहे. त्यातच एसटीनं भाडेवाढ केल्यानं त्याचाही भुर्दंड ग्रामीण भागातील जनतेवरच पडणार आहे.

S.T. Bus
ST Ticket Hike: महापुरानं ग्रामीण जनता त्रस्त त्यात एसटीनंही सोडली माणुसकी! दिवाळीला गावी जाण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे

निवडणुकांसाठी केली नव्हती भाडेवाढ

विशेष म्हणजे गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं एसटीनं दिवाळीच्या काळात केलेली भाडेवाढ एकाच दिवसात मागे घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा भाडेवाढीचा निर्णय मागे घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com