Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Mumbai BMC elections: मुंबईत मनसेचे 'इंजिन' सुसाट! उमेदवार ठरले; उद्या मिळणार अधिकृत 'एबी' फॉर्म!

Mumbai municipal corporation polls News : ठाकरे बंधूनी जागावाटपाची चर्चा पूर्ण केली आहे. त्यातच आता मनसेची यादी देखील तयार आहे. या यादीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज फायनल हात फिरवल्यानंतर शनिवारपासून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

BMC Election MNS List : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज्य ठाकरेंच्या मनसेच्या युतीची दोन दिवसापूर्वीच घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर ठाकरे बंधूनी जागावाटपाची चर्चा पूर्ण केली आहे. त्यातच आता जागावाटप पूर्ण झाले असल्याने मनसेची यादी देखील तयार आहे. या यादीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज फायनल हात फिरवल्यानंतर शनिवारपासून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत.

गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या व मनसे नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर मनसेचे नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे दोन्ही नेते एक बंद लिफाफा घेऊन राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बंद खाकी लिफाफ्यात मनसे उमेदवारांची अंतिम यादी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून संबंधित उमेदवारांना मनसेच्या कार्यालयातून उमेदवारीसंबंधीचे संदेश पाठवले जाणारा असल्याचे समजते.

मनसेकडून फायनल करण्यात आलेल्या उमेदवारांना उद्या सकाळपासून एबी फॉर्मचे वाटप केले जाणार आहे. दरम्यान, आता नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे दोघे राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत मनसे उमेदवारांच्या यादी फायनल केली जाणार आहे. मनसेच्या मुंबईतील उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर त्यांना उद्यापासून पक्षाचा एबी फॉर्म दिले जाणार आहेत. त्यासोबतच प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्रांची जुळवाजुळव करुन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी दिला जाणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मनसेकडून योग्य वेळेत आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. दादरमधील मुंबई महापालिकेतील वार्ड क्रमांक 192 हा युतीच्या अंतिम चर्चेमध्ये मनसेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर 192 वॉर्डमधून राज ठाकरेंच्या मनसेकडून मनसे नेते यशवंत किल्लेदार निवडणूक लढवणार सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 2017 च्या निवडणुकीत 192 या वॉर्डमधून ठाकरे गटाच्या प्रिती पाटणकर विजयी झाल्या होत्या. वॉर्ड क्रमांक 192 आपल्याला मिळावा यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हे शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT