BJP Rebel Fear : भाजपला सतावतेय बंडखोरीची भीती, बाहेरून आलेल्या उमेदवारांमुळे निष्ठावंतांमध्ये खदखद!

Chhatrapati Sambhajinagar Municipal Elections : भाजपामध्ये बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार असल्यामुळे आधीच दहा वर्ष रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी आणखी पाच वर्षे वाट पाहण्याची आता निष्ठावंतांची तयारी अजिबात नाही त्यामुळे आमचा विचार झाला नाही तर सर्व पर्याय खुले असल्याचे भाजपातील अनेक इच्छुक नगरसेवक आणि पदाधिकारी बोलून दाखवत आहेत.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News, 26 Dec : एकीकडे युतीसाठी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत सुरू असलेली तानाताणी तर दुसरीकडे भाजपमधील इच्छुकांची वाढती घालमेल पाहता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची भीती स्थानिक नेत्यांना सतावते आहे. महापालिका निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात ओबीसी मंत्री अतुल सावे खासदार भागवत कराड आमदार संजय केनेकर यांच्यासह सगळ्याच नेत्यांच्या तोंडून ही भीती व्यक्त करण्यात आली.

भाजपामध्ये बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार असल्यामुळे आधीच दहा वर्ष रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी आणखी पाच वर्षे वाट पाहण्याची आता निष्ठावंतांची तयारी अजिबात नाही त्यामुळे आमचा विचार झाला नाही तर सर्व पर्याय खुले असल्याचे भाजपातील अनेक इच्छुक नगरसेवक आणि पदाधिकारी बोलून दाखवत आहेत.

याबद्दलची चिंता भाजप प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनात अधिक दिसून आली. महानगरपालिका निवडणुकीसाठी सुरु करण्यात आलेल्या भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमाला आलेल्या कार्यकर्ते आणि इच्छूकांचा उत्साह शिगेला असला तरी नेत्यांना मात्र बंडखोरीचीच धास्ती असल्याचे जाणवले. प्रत्येक नेत्याने आपल्या भाषणात कोणाला तरी एकाला तिकीट मिळणार आहे. त्यामुळे नाराज होऊ नका,बंडखोरी करू नका अशी विनवणी केली.

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (ता.25) उत्साहात पार पडले. यापुढे तापडिया कासलीवाल मैदानातुन निवडणूकी संबधीच्या हालचाली होतील. दहा वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीचा उत्साह यावेळी कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे कार्यालय उद्घाटनाला इच्छुक आणि कार्यकर्त्यांची गर्दी होती.

BJP
Prashant Jagtap : काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या प्रशांत जगतापांना उद्धव ठाकरेंचा फोन, शिवसेनेच्या ऑफरवर म्हणाले, '2 ते 3 तासांत भाजपला आव्हान देणाऱ्या पक्षातच...'

याप्रसंगी शहरातील विविध भागातून पदाधिकारी, कार्यकर्ते, यावेळी आले होते. सर्वच नेत्यांनी इच्छुक अधिक असल्याने कुणाला तरी तिकीट मिळेल, कुणाला मिळणार नाही हे चालणार. परंतु ज्यांना तिकिट मिळणार नाही त्यांनी नाराज होऊ नये. पक्ष, कमळ हेच आपली निशाणी, आपला महापौर महापालिकेत बसवायचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे आवाहनही नेत्यांनी केले.

बंडखोराची धास्ती का ?

भारतीय जनता पक्षात अनेक इच्छुक आपआपल्या प्रभागात काम करित आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रभाग बांधून ठेवला. परंतु आता ऐनवेळी युती होण्याची शक्यता असल्याने प्रभागातील निम्म्या जागा मित्र पक्षाला जातील. उर्वरित जागेत दोघांनाच संधी मिळेल, इतर इच्छुकांना मात्र उमेदवारांचा प्रचार करावा लागेल. त्यामुळे त्यांच्या मनात खदखद सुरु झाली आहे. ही सर्व पार्श्वभुमी पाहता भाजप मध्ये बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

BJP
Bharat Gogawale son : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावलेंच्या मुलाच्या अडचणीत वाढ, कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला, 24 दिवसांपासून फरार...

भाजपमधील इनकमिंग

मागील काही दिवसात भाजप मध्ये जना कांबळे, राजू वैद्य, मनोज गांगवे, नरेश भालेराव, आशा भालेराव, अक्षय खेडकर हे ठाकरे गटातून भाजपात आले. यासह शिंदे गटाच्या जिल्हा संघटिका शिल्पाराणी वाडकर, अपक्ष माजी नगरसेविका किर्ती शिंदे, ज्योती अंभग, मनसेकडून आशिष सुरडकर, गजानन गौडा पाटील यांनी भाजपचा प्रवेश केला आहे.

ऐनवेळी इतर पक्षातून आलेल्या बहुतांश उमेदवारांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे तेथे तयारी करणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत. दहा वर्षानंतर निवडणूक होणार असल्याने आता थांबलो तर पुन्हा पाच वर्ष प्रतिक्षा करावी लागेल त्यामुळे आता थांबायचे नाही इतर पर्याया निवडायचा या मानसिकतेत कार्यकर्ते आले आहेत. काही इच्छुक त्या दृष्टीने तयारी देखील करित आहेत.

माझ्याकडे बी फॉर्म तयार - सावे

मलाही पूर्वी संधी मिळाली नव्हती. तेव्हा डॉ. भागवत कराड यांना संधी मिळाली. मी मतदार संघात फिरुन त्यांचे काम केले. 20140मध्ये संजय केणेकर यांना संधी मिळत होती. परंतु सर्वांनी मिळून समजूत काढल्याने केणेकर थांबले आणि मला संधी मिळाली. माझ्याकडे बी फॉर्म तयार आहेत. शहराअध्यक्षांमार्फत ते उमेदवारांना मिळतील. जो पर्यंत शहराअध्यक्ष सांगत नाही तो पर्यंत कुणी अर्ज भरु नये. ज्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही, त्यांना कमिट्या देण्याचा विचार होईल. भाजपच्या वाट्याला तब्बल 850 कमिट्या आहेत. त्यामुळे निवडणूकीत केवळ कमळ पहा असे मंत्री सावे म्हणाले.

त्यागाची भावना ठेवा - डॉ.कराड

स्थानिक निवडणूकीत युती व्हावी असे वरिष्टांचे आदेश आहेत. त्यामुळे युती करायची आहे. परंतु सन्मानपूर्वक युती व्हावी. शिवसेना आता पूर्वीची राहीलेली नाही. शिवसेना चालवणारे लोक आता आमच्यासोबत आहेत, अशा शब्दात डॉ. कराड यांनी मित्रपक्षाला टोला लगावला. दुसरीकडे भाजपचा महापौर करायचा असे सांगत त्यांनी बंडखोरी नकोच प्रत्येकाने त्यागाची भावना ठेवा असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.

बऱ्याच घडामोडी घडणार - केणेकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे कॅप्टन आहेत. आता छत्रपती संभाजीनगर मध्ये विरोधकांकडे खेळाडू (उमेदवार) नाहीत. हिंदूत्वाचा मुद्दा घेवून आम्ही पुढे चाललो आहोत. आपल्याला भाजपचा महापौर करायचा आहे, असे म्हणत आमदार संजय केणेकर यांनी आणखी बऱ्याच घटना घडणार आहेत असे सूचक वक्तव्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com