BJP–Shiv Sena Corporators Clash Sarkarnama
महाराष्ट्र

ShivsenaUBT Vs BJP : मोदी-ठाकरे नावांवरून रणांगण पेटलं! ‘चोर है’च्या घोषणा; भाजप-ठाकरसेना नगरसेवक आमने-सामने

Ritu Tawde Becomes Mumbai Mayor; BJP–Shiv Sena Corporators Clash Slogans Rock BMC : मुंबई महापालिकेत भाजप-एकनाथ शिंदे शिवसेनायुतीचे पदाधिकारी महापौर-उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारताना शिवसेनायुबीटी अन् भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले.

Pradeep Pendhare

Mumbai Municipal Corporation politics : मुंबई महापालिकेत भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना युतीने महापौर-उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी भाजप-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने पक्षाचे नगरसेवक आमने-सामने आल्याने अभूतपूर्व गोंधळ उडाला.

भाजप नगरसेवकांना 'मोदी-मोदी'च्या घोषणा देताच, ठाकरेसेनेच्या नगरसेवकांनी 'चोर है चोर है'च्या घोषणाबाजी केली. पुढे 'देवाभाऊ-देवाभाऊ' नावाच्या घोषणा सुरू होताच, ठाकरेसेनेच्या नगरसेवकांनी 'ठाकरे-ठाकरे', अशी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीने मुंबई महापालिकेच्या सभागृहातली वातावरण चांगलंच तापलं होतं.

मुंबई (Mumbai) महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेची सत्ता भाजपने हस्तगत केली. भाजपचा आज महापौर विराजमान झाला. या रितू तावडे यांनी पदभार स्वीकारला. मुंबई महापालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात आली. मात्र, सत्तारोहणाच्या पहिल्याच दिवशी भाजप अन् ठाकरेसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

मुंबई पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखनाद करण्यात आला. भाजपच्या महापौरांच्या सत्तारोहणाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. या मुळे भाजपच्या नगरसेवकांच्या अंगात प्रचंड उत्साह होता. यातून भाजपच्या नगरसेवकांनी 'जय श्रीराम' आणि 'मोदी-मोदी'च्या घोषणा देण्यास सुरवात केली.

भाजपच्या नगरसेवकांकडून मोदी-मोदीचा जयघोष थांबतच नव्हता. तेव्हा समोर उभ्या असलेल्या ठाकरेसेनेच्या नगरसेवकांनी भाजपच्या 'मोदी-मोदी' पाठोपाठ अचानक 'चोर है, चोर है', अशा घोषणा सुरू केल्या. ठाकरेसेनेच्या या नगरसेवकांच्या आक्रमकतेपुढे भाजप नगरसेवकांच्या 'मोदी-मोदी'च्या घोषणा थांबवल्या.

मोदी-मोदींच्या घोषणा थांबवल्यानंतर, भाजपच्या नगरसेवकांनी 'देवाभाऊ-देवाभाऊ' नावाने घोषणा सुरू केल्या. ठाकरेसेनेच्या नगरसेवकांनी 'चोर है, चोर है' घोषणा लगेच थांबवून, 'ठाकरे-ठाकरे' नावाचा जयघोष सुरू केला. दोन्ही बाजूंच्या घोषणांमुळे पालिकेचे सभागृह दणाणून गेले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम महापालिकेतील सभागृहाच्या गॅलरीत बसून हा सर्व प्रकार शांतपणे पाहत होते. पहिल्याच दिवशी ठाकरेसेना आणि भाजप नगरसेवक आमने-सामने आल्याने, खडाजंगी झाल्याने, आगामी काळातही मुंबईतील राजकारण, महापालिकेभोवती फिरत राहणार अशी चिन्हं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT