Baba Siddique Murder Case : ‘ऑर्डर फ्रॉम बिश्नोई’, बाबा सिद्दीकींवर गोळीबार; 27 आरोपींवर आरोपनिश्चिती, सलमान कनेक्शन चर्चेत

27 accused charged under MCOCA in 2026: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयात 27 जणांविरोधात आरोपनिश्चिती करण्यात आला आहे.
Latest updates on Baba Siddique murder trial starting February 2026
Latest updates on Baba Siddique murder trial starting February 2026Sarkarnama
Published on
Updated on

Baba Siddique Case: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने 27 जणांविरुद्ध आरोप निश्चित केले.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) कलमे आणि हत्या करणे, भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांतर्गत खटला चालविला जाणार आहे. या प्रकरणातील आरोपी 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहे.

अभिनेता सलमान खानशी जवळचे संबंध आणि टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बिश्नोईच्या (UnderWorld) आदेशावरून गोळीबार केल्याचा दावा गुन्हे शाखेने केला आहे. 12 ऑक्टोबर 2024ला बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर वांद्रे (पूर्व) इथल्या त्यांचा मुलगा, माजी आमदार झिशानच्या कार्यालयातून बाहेर पडताना तीन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती.

या प्रकरणासंदर्भात मुंबई पोलिसांनी (Police) 27 जणांना अटक केली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेतून भारतात आणलेल्या गुंड अनमोल बिश्नोई हा या प्रकरणातील आरोपी आहे.

Latest updates on Baba Siddique murder trial starting February 2026
HSC English exam mass copying : बारावीचा पेपर की ‘मास कॉपी’चा शो? CCTV समोरच उघड धुमाकूळ; उत्तर महाराष्ट्रात कॉपी केसेसचा स्फोट!

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक आकाशदीप करज सिंगला उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. प्रथमदर्शनी आरोपींचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने अर्ज मंजूर करताना नोंदवले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सिंग या प्रकरणातील जामीन मिळवणारा पहिला आरोपी ठरला.

Latest updates on Baba Siddique murder trial starting February 2026
Rohit Pawar press conference : अजितदादा किती सतर्क? प्लास्टिक अन् काचेच्या पाणी बाटलीमागचा किस्सा ऐकून सगळे अवाक!

तपास यंत्रणेचा संपूर्ण खटला अर्जदाराने केलेल्या दोन फोन कॉल्सवर अवलंबून आहे. केवळ फोन कॉल केल्याने अर्जदाराचा संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचे म्हणता येणार नाही, अशा प्रकारचा कोणताही संबंध खटल्यादरम्यानच सिद्ध करावा लागेल, असे निरीक्षण न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकलपीठाने आकाशदीप सिंगला जामीन मंजूर करताना नोंदवले आणि एक लाख रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर त्यासोबतच स्थानिक हमीदाराच्या अटीवर जामीन मंजूर केला.

तसेच महाराष्ट्रातच राहण्याचे आणि महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी संबंधित पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिला. सिंग हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सदस्य होता. तथापि, सिंगने सहआरोपीला दोन कॉल करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या फोनचा हॉटस्पॉट वापरला होता, असा दावा तपास यंत्रणेने केला होता; परंतु सिंगला संघटित गुन्हेगारी कृत्यांची माहिती असल्याचे दाखवणारा कोणताही पुरावा तपास यंत्रणेने सादर केला नसल्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.

तसेच मुख्य सहआरोपींच्या कबुलीजबाबामध्ये सिंगचे नाव नसल्याचे न्यायालयाने निरीक्षणास आणून दिले. त्यामुळे सिंगवरील आरोप प्रथमदर्शनी खरे आहेत, असा निष्कर्ष काढता येणार नाही. त्याचे तरुण वय आणि त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचेही जामीन अर्ज स्वीकारताना न्यायालयाने नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com