EVM Mumbai High Court Sarkarnama
महाराष्ट्र

High Court Decision : पोटनिवडणुकीपूर्वी EVM बाबत हायकोर्टाचा मोठा निकाल; देशात पहिल्यांदाच घडणार 'असं' काहीतरी!

EVM verification court order India : मुंबई उच्च न्यायालयाने देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच EVM तपासणीचे आदेश दिले. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Rashmi Mane

राज्यात बारामती आणि राहुरी येथे पोटनिवडणुकीची तयारी सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएम बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने ईव्हीएम तपासणीचे आदेश दिल्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशाच्या इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. हा निर्णय म्हणजे ईव्हीएमबाबत देशाच्या निवडणूक प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीशी संबंधित हा वाद आहे. 2024 च्या निवडणुकीत दिलीप लांडे यांनी नसीम खान यांचा पराभव केला होता. नसीम खान यांचा हा मतदारसंघ दीर्घकाळ बालेकिल्ला मानला जात होता. मात्र या पराभवानंतर त्यांनी निकालावर आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी ईव्हीएममध्ये काही गडबड झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

या याचिकेची दखल घेत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांनी ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली. ही तपासणी 16 आणि 17 एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे. विशेष म्हणजे ही प्रक्रिया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या ईव्हीएम उत्पादक कंपनीच्या देखरेखीखाली होणार आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती उपनिवडणूक अधिकाऱ्यांकडून नसीम खान यांना देण्यात आली आहे.

नसीम खान यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र 2019 आणि 2024 या सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यामुळेच त्यांनी यावेळी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाला ऐतिहासिक मानले जात असून, देशातील निवडणूक प्रक्रियेवर त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. ईव्हीएमबाबत अनेकदा शंका उपस्थित केल्या जात असताना, विशेषतः राहुल गांधी यांनी यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले होते. अशा परिस्थितीत न्यायालयाने दिलेला हा आदेश विरोधकांसाठी दिलासा देणारा मानला जात आहे. आता या तपासणीमधून काय निष्कर्ष समोर येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT