महापौर किशोरी पेडणेकर सरकारनामा
महाराष्ट्र

''माझ्या दादाकडे बघशील तर..महापौर किशोरी पेडणेकरांना धमकी

पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ''माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील,'' अशी धमकी देत या पत्रात अश्लिल भाषा वापरण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांना धमकीचे पत्र आले आहे. या पत्राव्दारे कुटुंब संपविण्याची धमकी देण्यात आली आहे. पेडणेकर महापैार झाल्यानंतर दुसऱ्यांदा आलेले हे धमकीचं पत्र आहे. हे पत्र कुणी पाठवले आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे पत्र मुंबईबाहेरुन आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच हे पत्र मराठीत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

या पत्रामध्ये पेडणेकर यांच्याबद्दल अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांना मिळालेलं हे धमकीचे पत्र पनवेल येथून कुरिअरद्वारे आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. पत्राच्या वर दुसरे नाव आहे आणि आतमध्ये वेगळे नाव असल्याचे सांगितले जात आहे. पेडणेकर यांना ज्या पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे, त्या पत्रावर जुन्या घराचा पत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. महापौरांना जी पत्रे येतात, त्यात हे देखील पत्र होतं. हे पत्र नेमकं कुठून आलं, ते कुणी पाठवलं याबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही.

या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ''माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील,'' अशी धमकी देत या पत्रात अश्लिल भाषा वापरण्यात आली आहे. हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे. याबाबत पेडणेकर या पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत. कुटुंबीयांसाठी संरक्षण देण्याची मागणी त्या करणार आहेत.

''माझा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, पण मी शिवसेनेची कार्यकर्ता आहे,'' असे पेडणेकरांनी ठणकावून सांगितले आहे. गेल्यावर्षीही महापौर किशोरी पेडणेकर यांना फोनद्वारे धमकी आली होती. त्यावेळी सुद्धा धमकावणाऱ्याने किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. आशिष शेलार यांनी जामिनासाठी अर्ज केला आणि त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर करण्यात आला. हे सगळं घडल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT