Devendra Fadnavis On Mumbai monorail incident sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मुंबईत मोनोरेलमध्ये घडलेल्या थरारानंतर सरकारची धावपळ! मुख्यमंत्र्यांनीही उचलले मोठे पाऊल

Mumbai monorail incident : मुंबईतील मोनेरेल तांत्रिक बिघाडामुळं भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान बंद पडली होती. त्यामुळे 300 प्रवाशी अडकून पडले होते. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीसह मोनोरेल बंद पडली आणि 300 हून अधिक प्रवासी अडकले.

  2. प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांची सुटका झाली पण विरोधकांनी सरकारवर गंभीर टीका केली.

  3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील उपाययोजना होणार आहेत.

Mumbai News : मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वेसह मोनोरेललाही बसल्याचे समोर आले आहे. चेंबूर भक्ती पार्क मार्ग या दरम्यानची मोनोरेल अचानक मध्येच बंद पडल्याची सुमारे 300 प्रवाशी दीड तासाहून अधिक काळ हवेतच अडकले होते. त्यातच लाईट कट, एसी बंद पडल्याने प्रवाशी गुदरमरले होते. यामुळे घाबरलेल्या काही प्रवाशांनी मोनेरेलच्या काच्या फोडल्या. तर काहींनी अग्निशमनसह पोलिसांना फोन लावला. पण लवकर मदत न पोहचल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. यानंतर घटनेची नोंद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबईत एकीकडे पावसाचा जोर वाढला असतानाच लोकल रेल्वेवरही त्याचा परिणाम झाला. यामुळे 300 हून अधिक प्रवाशांनी मोनोरेल्वेचा पर्याय निवडला. पण हा प्रवास सुरू असतानाच सायंकाळी 6.15 च्या दरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली. यामुळे सुमारे 300 प्रवाशी दीड तासाहून अधिक काळ हवेतच अडकले. शेकडो प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडल्याने एसीही बंद पडला. यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रवाशी आतमध्ये गुदरमरले. यामुळे मोनो रेल्वेच्या काचा फोडण्याचा प्रयत्न झाला. पण लवकर काही मदत पोहची नाही. यामुळे आता वाद निर्माण झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह काँग्रेसने यावरून टीका केली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

फडणवीस यांनी, काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. सर्वांनी संयम ठेवावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. मी एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. हा प्रकार का घडला, याचीही चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेवरून “कुणीही घाबरु नका, अग्निशमन दलाचे अधिकारी पोहचले आहेत. यंत्रणा पोहचली आहे. तुम्ही काळजी करु नका, घाबरु नका. एक दुसऱ्याला तुम्ही धीर द्या. सगळी यंत्रणा तुम्हाला खाली उतरवण्यासाठी आली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. शांतपणे सगळे नीट व्यवस्थित बाहेर या.” असं आवाहन केले आहे.

याचवेळी शिंदे यांनी मोनो रेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने मोनो बंद पडली असावी, असा अंदाजही लावला आहे. या प्रकरणी ते म्हणाले, हार्बर लाइन बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांनी मोनो रेल्वेचा आधार घेतला असावा. मोनोची क्षमता मेट्रोच्या तुलनेत कमी असते. मोनो रेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली असावी, त्यामुळेच ती एका बाजूला टिल्ट झाली असेल. त्यामुळे वीज पुरवठा बंद पडून मोनो बंद पडली असावी. तांत्रिक बिघाड कशामुळे झाला? चूक कुणाची झाली? याची चौकशी केली जाईल. पण आता बचाव कार्य महत्वाचे असून ते सुरू आहे. याबाबत महापालिका आयुक्तांशी बोलणं असून रुग्णवाहिका आणि इतर टीमही तेथे पाठवण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.

असे काढले प्रवाशांना बाहेर

चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल बंद पडल्याने 300 प्रवाशी अडकून पडले होते. यात वृद्धांसर बालकांचा देखील समावेश होता. वरून कोसळणाऱ्या सरी आणि बंद पडलेल्या मोनो रेल्वेमुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. त्यातच एसी देखील बंद पडल्याने प्रवाशी गुदमरले जात होते. तब्बत दीड तासांपासून अधिक वेळ प्रवाशी मोनो रेल्वेमध्येच अडकून पडले होते. यानंतर मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. तसेच अग्निशमन दलाचे बंबही सज्ज ठेवण्यात आले होते. तर तीन क्रेनच्या साहाय्याने अग्निशमन दलाचे जवानांनी बचाव कार्य सुरू केले होते.

यावेळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचनेनुसार अग्निशमन दलाचे प्रमुख परब आणि अतिरिक्त आयुक्त घटनास्थळी पोहचले होते. तर प्रवाशांच्या सेवेसाठी 'बेस्ट'च्या सुमारे चार ते पाच बसेस ही आल्या होत्या. यासह रेस्क्यू केलेल्या लोकांच्या उपचारांसाठी सायन रुग्णालय, गोवंडी शताब्दी रूग्णालय, राजावाडी रुग्णालय, केईएम रूग्णालयात बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. डॅाक्टरांनाही अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर येण्यासाठी दरवाजा बंद असल्यामुळे अडचणी येत होत्या. यावेळी प्रवाशांनी बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी काचा फोडल्या. तसेच सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तसेच एक दरवाजाही उघडून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

FAQs :

प्र.१: मोनोरेलमध्ये किती प्रवासी अडकले होते?
उ.१: सुमारे 300 हून अधिक प्रवासी मोनोरेलमध्ये अडकले होते.

प्र.२: प्रवाशांची सुटका कशी करण्यात आली?
उ.२: प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू करून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

प्र.३: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय निर्णय घेतला?
उ.३: त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT