Mumbai Rain Red Alert : कालपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. मागील 2-3 दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
अशातच आता मुंबईत आज देखील हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यात देखील मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसह, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भाला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने अति महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका अशा सूचना दिल्या आहेत. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 18 व 19 ऑगस्टसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यामुळे या जिल्ह्यातील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यभरात पावसाने थैमान घातलं आहे. नांदेड जिल्ह्यात पावसाच्या पाण्यात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी सैन्याला पाचारण करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर पावसाच्या पाण्यामुळे आता राज्यातील राजकारण देखील तापलं आहे.
पावसामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला आहे. फेकनाथ मिंधे ह्यांच्या रस्ते घोटाळ्यामुळे मुंबईच्या रस्त्यांची आज दुरवस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एका घोटाळ्यामुळे मुंबईतील रस्त्यांची अवस्था वाईट आहे आणि पावसात लोकांना अडचणी येत आहेत. निवडणुका न घेतल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकार बीएमसीवर नियंत्रण ठेवत आहे आणि त्यात जबाबदारीचा अभाव असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आता पावसाच्या पाण्यावरून राज्यातील राजकारण देखील तापल्याचं दिसत आहे. दरम्यान, आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. यात अतिवृष्टी संदर्भात काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.