Mumbai News : धर्मवीर चित्रपटाच्या यशानंतर आता, धर्मवीर 2 चित्रपट आज रिलिज झालाय. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे', हा पहिला चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांचा शिवसेना संघटनेतील प्रवास आणि संघर्षमय वाटचालीवर होता. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता.
आता विधानसभा निवडणुकीपूर्वी आज शुक्रवारी 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2' रिलिज झाला आहे. या चित्रपटातून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदूत्व सोडल्याची अप्रत्यक्ष टीका केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी या चित्रपटावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या पहिल्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2' रिलिज झाला आहे. या चित्रपटातील काही संवाद थेट हिंदुत्वाचे आहेत. यातून अप्रत्यक्षपणे शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टार्गेट केले गेले आहे. त्यामुळे या चित्रपटातील संवादाचा अर्थ काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी डिवचत आहेत. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी थेट भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरुद्ध खोचक प्रतिक्रिया दिली.
'धर्मवीर 2' चित्रपटातून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हिंदुत्वाची (HINDU) कास सोडल्याने एकनाथ शिंदे संघटना घेऊन पुढे गेल्याचं म्हटलं आहे. यावर खासदार अनिल देसाई म्हणाले, "अशा कुठच्या फिल्ममधून, एखाद्या पक्षाची भूमिका, पक्ष नेतृत्व सांगत असेल, तर हे जग कुठच्या कुठं गेलं असतं". यानंतर धर्मवीर 3 आल्यास, त्याची पटकथा मी लिहिणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, असं विचारताच, 'स्वतःचीच पटकथा लिहायची वेळ आहे, यावर मी अधिक काय बोलू', असा खोचक टोलाही खासदार देसाईंनी लगावला आहे.
'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट रिलिज झाला होता, त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. ते चित्रपट पाहण्यासाठी गेले असता, तो अर्ध्यावर सोडून आले असल्याचे बोलून टीका करण्यात आली होती. यानंतर शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे यांनी बंड केले. भाजपच्या बळावर मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ते सुरत व्हाया गुवाहाटी गेले होते. त्यावेळी 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'मधील 'कुठे आहे, एकनाथ', हा डायलाॅग समाज माध्यमांवर खूप व्हायरल झाला होता.
आता 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2' रिलिज झाला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा चित्रपट रिलिज करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे टायमिंग साधलं आहे. यातून हिंदुत्वाच्या मतपेढीवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. शिवसेनेतील बंडामागे फक्त हिंदुत्व असल्याचा मेसेज या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.