Vidarbh Politics : मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय अपक्ष आमदाराने वाढविला सस्पेन्स; कोणत्या पक्षाकडून विधानसभा लढणार?

MLA Ashish Jaiswal News : महाविकास आघाडी सरकार असताना ते उद्धव ठाकरेंच्याही जवळ होते. त्या वेळी ठाकरेंनी त्यांना खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जयस्वाल हेसुद्धा त्यांच्यासोबत गेले. महायुती काळातही त्यांच्याकडे महामंडळ कायम ठेवण्यात आलेले आहे.
MLA Ashish Jaiswal
MLA Ashish JaiswalSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 27 September : राटमेक मतदारसंघाचे आमदार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक आशिष जयस्वाल हे कुठल्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवणार, याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. ते मुख्यमंत्री शिंदेंसोबत असले तरी त्यांनी अद्याप अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केलेला नाही.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे आमदार जयस्वाल यांच्याबाबत उत्सुकता अधिक ताणली आहे. आमदार जयस्वाल यांनी आपण रामटेकमधून विधानसभा लढणार आहोत. मात्र, कुठल्या पक्षाकडून लढणार, याचे उत्तर लवकरच मिळेल, असे सांगून त्यांनी सस्पेन्स आणखीच वाढवला आहे.

मूळचे शिवसैनिक असलेले आशिष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांनी रामटेकमधून पाच वेळा धनुष्यबाणावर निवडणूक लढवली आहे. विधानसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्यांचा पराभव केला होता. पुढील २०१९ च्या निडवणुकीत जयस्वाल अपक्ष लढले आणि विजयी झाले. तेव्हापासून ते महायुतीसोबत आहेत.

महाविकास आघाडी सरकार असताना ते उद्धव ठाकरेंच्याही जवळ होते. त्या वेळी ठाकरेंनी त्यांना खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जयस्वाल हेसुद्धा त्यांच्यासोबत गेले. महायुतीच्या काळातही त्यांच्याकडे खनिकर्म विकास महामंडळ कायम ठेवण्यात आलेले आहे.

MLA Ashish Jaiswal
Mangalvedha politics : ‘भाजपच्या आमदाराने यूपी, बिहारच्या कामगारांना बनविले मतदार’

कधी ते भाजपत जाणार तर कधी शिवसेनेत अशा चर्चा रामटेक विधानसभा मतदारसंघात सुरू असते. जयस्वाल यांनीसुद्धा अद्याप याचा कधीच खुलासा केलेला नाही. आजही पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी सर्व पत्ते वेळेवर उघडले जातील, असे सांगून आणखी उत्सुकता वाढवली आहे.

मी मतदार संघात काम करतो. कुठल्याही पक्षाकडून लढलो तरी नक्कीच मताधिक्याने निवडून येईल, असाही दावाही त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी जवळीक आहे, हे त्यांनी मान्य केले आहे. त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तरी तो माझ्या हिताचाच राहील.

MLA Ashish Jaiswal
Prashant Paricharak : ‘मला माढ्यात पाठवून पंढरपुरातील विरोधकांची वाट सोपी करायची का?’; प्रशांत परिचारकांचे पंढरपुरातून लढण्याचे संकेत

निवडणुकीत उमेदवार देताना ते मेरिटवरवर निर्णय घेतील, असेही आमदार जयस्वाल सांगत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे आमदार भाजपत जाणार, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com