BMC Maha Nagarpalika  Sarkarnama
महाराष्ट्र

bmc job scam : मुंबई महापालिकेत महिला कर्मचाऱ्याचा कारनामा, ४३ जणांना ठगत लाटले ३३ लाख

mumbai municipal corporation fake job : मुंबई महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ४३ जणांची ३३ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Aslam Shanedivan

  1. मुंबई महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ४३ जणांची ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

  2. सांगलीतील ५० वर्षीय शेतकऱ्यासह सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधील नागरिक या घोटाळ्याचे बळी ठरले.

  3. याप्रकरणी कुर्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

maharashtra crime News : मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ४३ जणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मुंबई महानगरपालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याने नाव समोर येत असून सुमारे ३३ लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी कुर्ला पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलिस तपास करत असून फसवणुकीची रक्कम आणि फिर्यादींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई महानगरपालिका (बीएमसी) चे नाव पुढे करून नोकरी लावून देण्याचे आमिष मुंबईसह सांगली, सातारा, कोल्हापूरमधील ४३ जणांना दाखवण्यात आले होते. यात सांगलीतील एका ५० वर्षीय शेतकऱ्याचाही समावेश आहे. याच शेतकरी अनिलकुमार गाँजारी (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीत गाँजारी यांनी, जून २०२४ मध्ये त्यांची नातेवाइकांच्या माध्यमातून माया चव्हाण (वय ५९) हिच्याशी ओळख झाली. संबंधित महिला मुंबई महापालिकेच्या एल वॉर्ड (कुर्ला) येथे कार्यरत असल्याचे तीने सांगितले होते. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपला थेट संपर्क असल्याचा दावाही तिने अनेकदा केला होता. तसेच विविध पदांवर नोकरी मिळवून देण्याची हमीही दिली होती.

यावेळी त्या महिलेनं शिपाई, लिपिक, आर. ए. लिपिक व हेड क्लार्क पदांसाठी १.७० लाख ते २.५० लाख रुपयांचा आकडा सांगितला. तसेच सुरुवातीला फॉर्म फीच्या नावाखाली रक्कम घेत उमेदवारांकडून कागदपत्रे मागविण्यात आली होती. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घाटकोपर पूर्व येथील पारेख हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. त्यावेळी देखील प्रत्येक उमेदवाराकडून १० हजार रुपये रोख स्वरूपात घेण्यात आले असा आरोप गाँजारी यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे.

तर ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान विविध बँक खात्यांवर ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे २४ लाख ६८ हजार दिले असून मुंबईत प्रत्यक्ष भेटीदरम्यान ८ लाख ३० हजार रुपये रोख दिलेत. तर एकूण फसवणुकीची रक्कम सुमारे ३३ लाखांपर्यंत पोहोचल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

दरम्यान आता कुर्ला पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत संबंधित महिला महानगरपालिकेत केवळ शिपाई पदावर कार्यरत असल्याचे समोर आले आहे. तर इतर संशयितांनी बनावट ओळखपत्रे व शिक्क्यांचा वापर करून स्वतःला अधिकारी म्हणून भासविल्याचा आरोप आहे. तर याच प्रकरणात प्रथमेश चव्हाण, सुरेंद्र गुरव, राहुल जाधव (स्वतःला बीएमसी अभियंता म्हणून सांगणारे) आदींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

FAQs :

1. हा घोटाळा नेमका कशाबाबत आहे?
मुंबई महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्यात आले.

2. किती लोकांची फसवणूक झाली आहे?
एकूण ४३ जणांची सुमारे ३३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

3. पीडित नागरिक कोणत्या जिल्ह्यांतील आहेत?
मुंबईसह सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिक या प्रकरणात बळी ठरले आहेत.

4. गुन्हा कुठे दाखल करण्यात आला आहे?
कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5. नागरिकांनी अशा फसवणुकीपासून कसे सावध राहावे?
सरकारी नोकरीसाठी अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा आणि कोणत्याही दलाल किंवा एजंटकडे पैसे देऊ नयेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT