BMC Shivsena News : स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली! आमदार पुत्राची फिल्डिंग, जुने नेतेही लागले कामाला!

Mumbai municipal corporation News : मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवकाची पदे आली आहेत. त्यामुळे या दोन जागांवर आपलीच वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
BMC Election eknath Shinde
BMC Election eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवकपदाची संधी हुकलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेतेमंडळीने स्वीकृत नगरसेवकपदावर वर्णी लावावी या उद्देशाने जोरदार फिल्डिंग लावली आहे. मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवकाची पदे आली आहेत. त्यामुळे या दोन जागांवर आपलीच वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यावरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुकांत स्वीकृत नगरसेवक पदावरून जुंपली आहे. त्यामध्ये ऐनवेळी तिकीट कापलेल्या आमदार पुत्रासह एबी फॉर्म देऊनही फॉर्म भरता न आलेल्या नेत्याच्या नावांची चर्चा जोरात आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे याठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवकाची पदे आली आहेत. या पार्श्वभूमीवर काही माजी नगरसेवक तसेच पराभूत उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर फेऱ्या मारत आहेत. स्वीकृत नगरसेवकपदासाठी त्यांच्या पक्षातील इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

BMC Election eknath Shinde
Omraje Nimabalkar यांच्याविरोधात शिवसैनिक नाराज, पक्ष सोडणार ? Shivsena UBT, Dharashiv

या दोन पैकी एका पदासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांचा त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. मुंबईतील मागाठाणे परिसरातील प्रभाग क्रमांक पाचमधून ऐनवेळी त्यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज झाले होते. त्यांच्याऐवजी या ठिकाणी उपमहापौर संजय घाडीना उमेदवारी देण्यात आली होती. त्या प्रभागात सुरुवातीपासून काम असल्याने इतरत्र जाऊन निवडणूक लढविण्यास घाडी यांनी नकार दर्शवला होता. त्यामुळे नाराज झालेले प्रकाश सुर्वे काही दिवस शिवसेनेच्या (Shivsena) प्रचारात दिसले नव्हते. त्यामुळे राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवकपद देऊन पक्षाकडून ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

BMC Election eknath Shinde
Shivsena VS BJP : शिवसेना नेत्याचा भाजपवर मोठा आरोप; 25 लाख देऊन राष्ट्रवादी नगरसेवकाला फोडले

दुसरीकडे या पदासाठी बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पालिकेच्या निवडणुकीवेळी पक्षाने बाळकृष्ण ब्रीद यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र काही कागदोपत्री त्रुटींमुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. त्या वेळी त्यांनी पक्षाने दिलेला एबी फॉर्म अपक्ष उमेदवाराला दिला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

BMC Election eknath Shinde
BJP Politics: `पक्षांतर` फळलं की नडलं? भाजपच्या `कमळा`त जाताच हॉटेलवर पालिकेचा `बुलडोझर`!

स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागांसाठी सुरू असलेल्या या लॉबिंगमुळे शिवसेनेत अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. अखेर पक्ष नेतृत्व कोणाला संधी देणार, याकडे आता मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.

BMC Election eknath Shinde
NCP leader rape case : अभिषेक कळमकर याचा काळा कारनामा; मोठ्या ताईंची शांतता की समर्थन? चित्रा वाघांचा सडेतोड हल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com