Bachchu Kadu Sarkarnama
महाराष्ट्र

Bachchu Kadu News: मोठी बातमी! मुंबई सत्र न्यायालयाचा बच्चू कडूंना झटका;थेट तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

Mumbai Court News: माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयानं सरकारी कामात अडथळा आणि कर्मचाऱ्याला धमकावल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : मुंबई सत्र न्यायालयानं माजी आमदार व प्रहार संघटनेचे सर्वोच्च नेते बच्चू कडू यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांमधे प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना मुंबई सत्र न्यायालयानं सरकारी कामात अडथळा आणि कर्मचाऱ्याला धमकावल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात याप्रकरणी बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बच्चू कडू यांच्याकडून 7 वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून (Court) कडू यांना तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यावरच थांबले नाही, तर त्यांना कठोर शब्दांत फटकारलं आहे.

न्यायालयानं बच्चू कडू यांच्यावर आमदार असल्यानं तुम्हांला हल्ला करण्याचा परवाना देण्यात आलेला नाही अशा शब्दांत ताशेरे ओढले आहे. पण याप्रकरणी बच्चू कडू यांना तत्काळ जामीनही मंजूर करण्यात आला आहे. तसेच आता बच्चू कडू यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबई सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं. ते म्हणाले, परीक्षा पोर्टलचा घोटाळा झाला होता. त्याकाळी केंद्रात सुविधा नव्हत्या. विद्यार्थ्याचे हाल होत होते.परीक्षा प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाला होता असा आरोप केला.

याबाबत आयटीच्या संचालकांना पत्र देऊनही त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी लॅपटॉप उचलला म्हणून माझ्याविरोधात तक्रार दाखल केल्याचा दावाही बच्चू कडू यांनी यावेळी केला होता.

शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात यवतमाळच्या महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बच्चू कडू सातबारा कोरा यात्रा काढली होती. या यात्रेचा समारोप यवतमाळ इथं झाली. यानिमित्ताने सभा झाली. या सभेचं स्थळ अचानक बदलल्यानं बच्चू कडू यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सातबारा कोरा यात्रेची समारोप सभा नियोजित ठिकाणी न घेता नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर घेण्यात आली. विना परवानगी महामार्गावर सभा घेतल्याने माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यासह आयोजकांवर महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT