Nagpur Scam : विदर्भात गाजत असलेल्या 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात मोठी अपडेट; न्यायालयाचा भाजप नेत्याच्या भावाला दणका

Vidarbha Shalarth ID Scam Case : विदर्भात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात संशयित असलेले सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
Maharashtra School Education Shalarth ID Scam Case
Maharashtra School Education Shalarth ID Scam CaseSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: विदर्भात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात संशयित असलेले सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. ते भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे भाजपचे (BJP) माजी खासदार सुनील मेंढे यांचे भाऊ आहेत. मेंढे यांच्यासह न्यायालयाने नीलेश वाघमारे यांचा अटकपूर्व तर अटकेत असलेले सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी यांचाही नियमित जामीन फेटाळण्यात आला आहे. बोगस शालार्थ आयडी प्रकरणाचा शोध घेण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याप्र

बोगस शालार्थ आयडी प्रकरणाचा शोध घेण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याप्रकरणात विशेष तपास पथकाने जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी विठोबा कुंभार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्‍वर श्रीराम काळुसे यांना अटक केली. दोघांनीही शालार्थ आयडी देणे बंद असताना, 398 नवीन शिक्षकांचे वेतन काढून 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर आले आहे..

या घोटाळ्यात सर्वात आधी नीलेश वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासात बारा आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये माजी उपसंचालक उल्हास नरड, चिंतामण वंजारी, वैशाली जामदार यांच्यासह शिक्षणाधिकारी, 4 कर्मचारी, चार संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा समावेश आहे. तपासात जवळपास साडेसहाशे आयडी बोगस असल्याची बाब समोर आली.

त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी काळुसे यांनी 15 मार्च 2024 या दरम्यान तब्बल 154 शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार झाले नसताना त्यांचे पगार काढण्याची प्रक्रिया केली. याशिवाय रोहिणी कुंभार यांनी 21 मार्च 2022 ते 15 मार्च 2024 या दरम्यान 244 शिक्षकांचे प्रस्ताव बोगस असताना, अशाच प्रकारे वेतन काढले. त्यामुळे सरकारची 100 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली.

Maharashtra School Education Shalarth ID Scam Case
Sanjay Gaikwad Controversy: 'माझी कॉपी करणं उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही' म्हणणाऱ्या संजय गायकवाडांची 24 तासांतच पलटी; आता म्हणतात...

विशेष म्हणजे, या काळात पदभरती बंद असताना, त्यांनी या शिक्षकांच्या नियुक्तांना मान्यता दिली. पावसाळी अधिवेशनात नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळा चांगलाच गाजला होता. भाजप आमदारांच्या मागणीवरून शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.

नागपरचे पोलिस उपायुक्त उपायुक्त नित्यानंद झा यांना एसआयटीचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी चार दिवसांपूर्वी शिक्षणाधिकारी सिद्धेश्‍वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक केल्यावर शिक्षण विभागात खळबळ माजली. या अटकेनंतर शिक्षण विभागात नाराजीचा सूर उमटला.

Maharashtra School Education Shalarth ID Scam Case
Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या 'वोटचोरी' कॅम्पेनला मोठा धक्का; काँग्रेसनं भावनेच्या भरात केलेली गंभीर चूक आली समोर

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कामबंद करत, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निवेदने सादर केलीत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तपास अधिकाऱ्यांना बोलावून घेत, आढावा घेतला होता. या आढाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समितीच्या अध्यक्षपदी एका ‘आयएएस’ची नियुक्ती करण्याचे संकेत दिले होते. सोबतच एसआयटीची पुनर्रचना करण्यात आली असून पुण्याचे विभागीय आयुक्त आयएएस चंद्रकांत पुलकुंडवार यांना विशेष तपास पथकाचे प्रमुख करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com