Zilla Parishad elections Maharashtra : राज्यातील 29 महापालिकांसाठी सकाळपासून होत असलेले मतदान पुढील काही तासानंतर थांबणार आहे. तत्पूर्वी, मतदानाच्या दिवसभर गोंधळ राहिला. विशेष करून, मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा बोगस मतदानाचा प्रकार असल्याचा आरोप, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केला.
यानंतर राज्यभरात बोटावरील शाई पुसली जात असल्याचा गोंधळ सुरू झाला. यावरून तातडीने राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत खुलासा केला. तसंच महापालिका निवडणुकीतील अनुभवावरून, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये बोटावर कोणती शाई लावली जाणार, याबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
महापालिका निवडणुकांमध्ये (Municipal Election) मतदारांच्या बोटावरील शाई पुसला जात असल्याच्या तक्रारी आहेत. ते पाहाता जिल्हा परिषदेला मतदारांच्या बोटावर मार्करने शाई लावली जाणार का? यावर आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, 'मार्कर पेनचा अनुभव घेता, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटावर इंडेबल इंक वापरण्याचा निर्णय घेतला आहे.'
महापालिका निवडणुकीत मतदारांच्या (Voter) बोटावरील शाई पुसली जात आहे, याबाबत बोलताना दिनेश वाघमारे म्हणाले, "निवडणूक आयोग नेहमीच दोषी नसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान प्रक्रिया, मतदार यादीतील गोंधळ आणि मतदारांनी जागरूक राहण्याची आवश्यक आहे. आयोगाने मताधिकार ॲप, पोर्टल आणि मतदान केंद्रांवर वोटर फॅसिलिटेशन सेंटर्स उपलब्ध केले आहेत, जेणेकरून मतदारांना त्यांची माहिती सहज मिळू शकेल."
मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात नसल्याचा दावा करत दिनेश वाघमारे म्हणाले, "राज्य निवडणूक आयोग मतदारांच्या बोटावर शाई लावण्यासाठी वापरले जात असलेले मार्कर पेन 2011 पासून वापरत आहेत. ती शाई केंद्रीय निवडणूक आयोग वापरते तीच शाई आहे. ही शाई लावल्यानंतर 10 ते 12 सेकंद लागतात. मतदार हा तोपर्यंत मतदारकेंद्रातच असतो. ही शाई सुकल्यानंतर ती कुठल्याहीप्रकारे काढता येत नाही अन् ही शाई वेगळी नाही."
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत, दिनेश वाघमारे यांनी, "शाईच्या प्रकरणाची आम्ही चौकशी करू. शाई पुसली जाते असा फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे. सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निवडणूक आयोग निष्पक्ष काम करत आहे. कुठल्याही प्रकारचा फेव्हर आम्ही करत नाहीत. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व गोष्टी निवडणूक आयोगावर ढकलल्या जात आहेत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.