Bogus voters with voter ID : मतदान कार्डच्या गठ्ठ्यासह बोगस मतदार पकडला! अहिल्यनगरात हाहाकार, 'मतदान थांबवा', सूत्रधार शोधा?

Fake Voters Caught with Voter IDs in Ahilyanagar Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत बोगस मतदारांना मतदान कार्डासह पकडल्याने गोंधळ उडाला आहे.
Bogus voters with voter ID
Bogus voters with voter IDSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत बोगस मतदारांना पकडण्यात आले आहे. केडगाव आणि सावेडी उपनगरात हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, बोगस मतदारांना पकडून उमेदवारांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

या बोगस मतदारांकडे मोठ्याप्रमाणात बोगस मतदान कार्डचा गठ्ठा सापडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या बोगस मतदारांमागील सूत्रधार कोण याचा शोध घ्या? तसंच बोगस मतदान करायचे असेल, तर मतदान प्रक्रिया बंद करा, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रियेत गोंधळ उडाला.

अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात प्रभाग क्रमांक तीनमधील आनंद विद्यालयात मतदान केंद्रावर निवडणूक (Election) कार्डासह दोन बोगस मतदारांना पकडण्यात आलं. यामुळे एकच खळबळ उडाली. या दोघांची झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या नावांची शेकडो बनावट निवडणूक ओळखपत्रे आढळली. मतदान केंद्रावरील उमेदवारांनी यावर आक्षेप घेतला.

या बोगस मतदारांना (Voter) पोलिसांनी ताब्यात घेतले. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे मोठं कटकारस्थान आहे. हे प्यादे आहेत, त्यांच्यामागील मोठा सूत्रधाराचा शोध घ्या, अशी मागणी केली. पोलिसांनी देखील या दोघांकडे सखोल चौकशी सुरू केली असून, बनावट ओळखपत्रे कोणी व कुठे तयार केली? यामागे कोणाचा हात आहे? एखाद्या संघटित टोळीचा प्रकार आहे का? एखाद्या उमेदवाराशी याचा थेट संबंध आहे का? या सर्व बाबींचा तपास सुरू केला आहे.

Bogus voters with voter ID
BJP workers EVM damage : मतदान केंद्रात घुसखोरी, EVM मशीन फोडली; धुळ्यात निवडणुकीला गालबोट, शिंदेसेना-भाजप आमनेसामने

ही ओळखपत्रे अत्यंत शिताफीने तयार करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेत मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट होण्याची शक्यता असल्याने उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि मतदान केंद्रावरील पोलिंग एजंटला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

Bogus voters with voter ID
Pune Bhosari Land Scam : खडसेंना दिलासा नाहीच! जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात न्यायालय कठोर; कुटुंबियांच्या अडचणी वाढणार?

उमेदवारांची जोरदार घोषणाबाजी

या बोगस मतदानावरून अहिल्यानगरच्या सावेडी भागातील मतदान केंद्रावर चांगलच वातावरण तापलं होतं. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर एकत्र येत, जोरदार घोषणाबाजी केली. 'बोगस मतदान थांबवा', 'सूत्रधार शोधा', 'बोगस मतदान थांबवता येत नसेल, तर मतदान थांबवा', 'बंद करा, बंद करा, मतदान बंद करा', 'बोगस मतदान बंद करा', अशा घोषणा दिल्या.

परस्पर बोगस मतदान

केडगाव इथं मतदान केंद्रावर, प्रभाग क्रमांक 17 मध्ये एका महिलेचे परस्पर मतदान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव होता. मतदान केंद्रात हा बोगस मतदान घडल्याने निवडणूक आयोगाने नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत.

शिवसेना अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक

मीनाक्षी चव्हाण या महिले मतदाराबरोबर हा प्रकार घडला आहे. या बोगस मतदानाच्या प्रक्रियेवर एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला, लेखी द्या, चूक झाली, बोगस मतदान थांबवू शकलो नाही, अशी मागणी केली. या मागणीपुढे निवडणूक अधिकारी निरूत्तर झाले होते.

निवडणूक आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर

अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक तीन मधील आनंद विद्यालय मतदान केंद्र परिसरात बनावट ओळखपत्रांबाबत समोर आलेल्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल पोलिस चौकशी सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे. पोलिसांमार्फत कसून चौकशी सुरू असून, चौकशीत निष्पन्न होणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही सुधीर पाटील यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com