Municipal election postponement Sarkarnama
महाराष्ट्र

Municipal election postponement : पंधरा दिवसाचा लांब पल्ला, उमेदवारांना खर्चाची धास्ती; ऑनलाइन संपर्कात, प्रत्यक्षात ऑफलाइन!

Municipal Election Postponed; Candidates Struggle With Campaign Expenses : दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकीत लांबणीवर पडल्याने उमेदवारांना प्रत्यक्षात खर्च परवडत नसल्याचे झालं आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra municipal elections : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी 20 डिसेंबरला मतदान होत आहे. उच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी सुरुवातीला केलेला प्रचार अन् त्यावर झालेला खर्च, यानंतर निवडणुका लांबणीवर गेल्याने वाढलेला खर्चाची धास्ती उमेदवारांनी घेतली आहे.

15 दिवस लांबणीवर पडलेल्या निवडणुकांमुळे उमेदवारांचं बजेट कोसळलं आहे. हे बजेट सावरण्यासाठी आता उमेदवारांनी ऑनलाइन संपर्कावर भर देताना, प्रत्यक्षात ऑफलाइन होणं पसंद केलं आहे.

राज्यातील 24 नगरपालिका व नगरपंचायतींचे नगराध्यक्ष, तर नगरपालिकेच्या 76 आणि नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांसाठी मतदान (Voter) होणार आहे. लांबणीवर पडलेल्या निवडणुकांमुळे उमेदवारांच्या खिशावर ताण वाढला आहे. जनतेत जावे, तर खर्चाची धास्ती आणि नाही गेले, तर पूर्वी आठ दिवस केलेला प्रचार वाया जाण्याची भीती, अशा संकटात उमेदवार सापडले आहेत.

निवडणुकीचा पंधरा दिवसाचा लांब पल्ला असल्याने अगोदरच खर्चाने मेटाकुटीस आलेल्या उमेदवारांनी सोशल मीडियाच्या प्रचारावर भर दिला आहे. उमेदवार ऑनलाइन (Social Media) छबी झळकत असले, तरी उमेदवार शहरात प्रत्यक्षात ऑफलाइन आहेत. अंतिम टप्प्यात आलेली निवडणूक अचानक रद्द होऊन पुढे ढकलण्यात गेल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांची अडचण झाली आहे. तयार झालेले वातावरण वीस दिवस टिकून ठेवण्याची कसरत उमेदवार करत आहेत.

उमेदवारांना खर्चासाठी जुळवा जुळव करावी लागत आहे. खर्चाने अगोदरच बेजार झालेल्या उमेदवारांना पुन्हा नव्या जोमाने फ्लेक्स, छपाई खर्च, पदयात्रा व सभा व सांगता सभा घ्याव्या लागणार असल्याने निर्माण झालेला बाका प्रसंग मुकाट्याने सहन करावे लागेल एवढे, मात्र तितकेच खरे.

खिशाला झळ

राज्यात दुसऱ्या टप्प्यात 24 नगरपालिका व नगरपंचायतींचे नगराध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहे. नगराध्यक्षपदावर सर्वच पक्षांचा डोळा आहे. तिथं आपलाच उमेदवार बसला जावा, यासाठी सर्व पक्षप्रमुखांचे लक्ष आहे. यासाठी इच्छुकांची संख्या देखील मोठी आहे. तीव्र स्पर्धा असल्याने इथला खर्च वेगळा अन् मोठा आहे. तो संभाळताना इच्छुकांची चांगलीच दमछाक होत आहे.

सायंकाळचा खर्च परवडेना

नगराध्यक्ष पदाकरिता इच्छुक असलेले राजकीय पक्षांचे उमेदवार अधूनमधून, तर अपक्ष उमेदवार रोजच शहरात फिरतात. सायंकाळी फिरणे खिशाला परवडत नसल्याचा अनुभव काही उमेदवारांनी बोलून दाखविला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT