Local Body Election  Sarkarnama
महाराष्ट्र

Municipal Election : महापालिका निवडणुका आता ऑक्टोबरमध्येच, काय आहे कारण?

Maharashtra Municipal Elections Update : न्यायालयाने 25 फेब्रुवारीला निवडणुका घेण्यासंदर्भात निकाल दिला तरी वाॅर्ड रचाना आणि इतर कामांसाठी साधारण 90 पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.

Roshan More

Municipal Election : मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्या मे महिन्याच्या अखेरीस होतील, अशी शक्यता होती. मात्र, नुकतीच सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातमध्ये सुनावणी झाली. न्यायालयाने आता सुनावणीसाठी 25 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे. त्यामुळे मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे.

न्यायालयाने 25 फेब्रुवारीला निवडणुका घेण्यासंदर्भात निकाल दिला तरी वाॅर्ड रचाना आणि इतर कामांसाठी साधारण 90 पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे जून महिना उजाडेल. जून ते सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर पाहता या कालावधीमध्ये निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात गणपती विसर्जन आणि पितृपंधरवड्यानंतरही निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इच्छुकांमध्ये नाराजी

मागील तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीनंतर या रखडलेल्या निवडणुका होतील या दृष्टीने इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, आता निवडणुका पुढे ऑक्टोबरमध्ये होणार असल्याने इच्छुकांमध्ये नाराजी आहे.

का रखडल्या निवडणुका?

- महाविकास आघाडीने केलेली प्रभाग रचना महायुती सरकारने रद्द केली. त्यामुळे प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारचा की निवडणूक आयोगाचा यावर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

- महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज संस्थांचा सदस्य संख्येमध्ये बदल करण्यात आला होता. त्यावर देखील आक्षेप घेण्यात आला.

- ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज संस्थामध्ये लागू करण्या संदर्भात वाद होते. ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायलयाचा निकाल आला नाही, या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत.

'मविआ'ला गळती

विधानसभेतील महायुतीच्या यशानंतर महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांचा ओढा महायुतीकडे वाढला आहे. त्यामध्ये महापालिका, स्थानिक स्वराज निवडणुका लांबणीवर पडल्याने विकासा कामे करून घेण्यासाठी तसेच आपले राजकीय हितसंबंध जपण्यासाठी महाविकास आघाडीतील माजी नगरसेवक, पदाधिकारी महायुतीमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT