Dhananjay Munde : एकीकडे राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना धनंजय मुंडेंसमोर नवे संकट; काय आहे प्रकरण?

Dhananjay Munde controversy News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेले वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्त्या होऊन ५० दिवसाचा काळ लोटला आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. पोलीस यंत्रणेकडून या हत्या प्रकरणाचा तपास केला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेले वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे पाय आणखी खोलात गेले असून मुंडे यांच्या मालकीच्या अनेक शेल कंपन्या आहेत. खंडणीची रक्कम त्यांनी वळती केल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकरणाचा थेट तपास उच्च न्यायाल्याच्या देखरेखेखाली करावा. त्यासोबतच याचा तपास समांतर ईडीने देखील करावा, यासाठी या प्रकरणी थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Dhananjay Munde
Dhananjay Munde: '...तर मी राजीनामा देणार', मंत्री धनंजय मुंडेची मोठी घोषणा

शेल कंपन्यात गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम कुठून आली, याचा तपास करण्यात यावा, या प्रकरणी मनी लाँडरिंग झाला असल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे. परळी येथील व्यंकटेश्वरा सेल्स इंडस्ट्रियल प्रा. लि. मध्ये धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे व वाल्मिक कराड व अन्य काही व्यक्ती संचालक आहेत. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि सक्तवसुली संचालनालयानेही समांतर तपास करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. योग्य तपास झाल्यास मंत्र्यावर मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते, असेही याचिकेत म्हटले आहे.

Dhananjay Munde
Dhananjay Munde News : एकापाठोपाठ एक गंभीर आरोप, राजीनाम्यासाठी वाढता दबाव; धनंजय मुंडे मीडियासमोरच झाले भावूक

या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेत बीडच्या पोलीस अधीक्षकांना तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, तसेच निवडणूक आयोगाला ही याचिका आणि मुंडे यांनी आयोगापुढे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र पडताळून कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dhananjay Munde
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय; जगमित्र कार्यालयाची चावी अजय मुंडेंच्या हाती, कराड सांभाळत होता काम

व्यंकटेश्वर इंडस्ट्रियलच्या कार्यालयात वाल्मीक कराडचे बेकायदा धंदे सुरू असतात. तेथूनच त्याने आवादा या पवनऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितली. या कंपनीचे संचालक धनंजय मुंडें आहेत. जगमित्र साखर कारखान्याचेही संचालक वाल्मीक कराड, धनंजय मुंडे व अन्य काही जण असून, या कारखान्याच्या कार्यालयाची जागा धनंजय मुंडे यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Dhananjay Munde
Supriya Sule : 'एकामुळे अजितदादांच्या पक्षाची 50 दिवस हेडलाईन'; खासदार सुळेंनी मंत्री मुंडेंना डिवचलं

दुसरीकडे उच्च न्यायालयात काही दिवसापूर्वीच धनंजय मुंडे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन निवडणूक जिंकल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मांचा दावा आहे की, त्यांचे धनंजय यांच्यासोबत कायदेशीर लग्न झालेले आहे. त्यांनी याचिका दाखल करुन गंभीर आरोप मंत्री मुंडेंवर केले आहेत.

Dhananjay Munde
Pankaja Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरील प्रतिक्रियेनंतर पंकजा मुंडेंचे मोठे विधान; म्हणाल्या,'मी फक्त तुमचं...'

करुणा शर्मा यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी परळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज 30 ऑक्टोबर 2024 रोजी फेटाळला होता. मात्र, धनंजय मुंडे आणि इतरांचे अर्ज मंजूर केले होते. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 23 नोव्हेंबर 2024 रोजीच्या मतमोजणीनंतर घोषित केले होते.

Dhananjay Munde
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंचे वाल्मिक कराडविषयीचे ‘ते’ विधान पुन्हा चर्चेत; सुरेश धस यांनी जोडले कनेक्शन

त्यानंतर करुणा शर्मा यांनी 4 जानेवारी 2024 रोजी खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे. आपण स्वतः 1996 मध्ये धनंजय मुंडे यांच्याशी कायदेशीर लग्न केले होते. अधिकृत पत्नी असताना धनंजय मुंडे यांनी दोन अपत्यांचा उल्लेख केला. मात्र, पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती दडवली, असल्याचे त्यांनी या याचिकेत म्हटले आहे.

Dhananjay Munde
BJP Mla Suresh Dhas : 'पालकमंत्री असताना, एकही रूपयांचे काम न करता 73 कोटींचा ढपला पाडला'; धस यांचे मुंडेंवर धक्कादायक आरोप

ड्रमायन, धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियानी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सादर करीत मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून राज्य सरकारवरील दबाव वाढवला जात आहे. संपूर्ण राज्यभर मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्याप्रकरणाचा मोर्चे काढून निषेध केला जात आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Dhananjay Munde
BJP - Congress Donation News : लोकसभेआधी भाजपला मिळाली तब्बल 3 हजारांहून अधिक कोटींची देणगी, तर काँग्रेसला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com