Murlidhar Mohol Sarkarnama
महाराष्ट्र

Murlidhar Mohol : अजितदादा आणि शरद पवारांच्या एकत्रि‍करणावर मोहोळ यांनी थोपटले दंड, म्हणाले, 'छोटे छोटे पैलवान...'

murlidhar mohol statement on ajit pawar sharad pawar : अजित पवार आणि शरद पवार यांच्या संभाव्य एकत्रीकरणावर भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला असून, युती आणि आघाड्यांच्या चर्चाही जोरात सुरू आहेत. एकीकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती बोलणी सुरू असताना, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत.

मात्र, या संभाव्य राष्ट्रवादी एकत्रि‍करणावर पुण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा, 'दादा विरुद्ध अण्णा' असा नवा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

काल रात्री उशिरा भाजप कोर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीवर सविस्तर चर्चा होऊन पहिली यादी फायनल करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणासह महाविकास आघाडीच्या सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केलं.

मोहळ म्हणाले, भाजपच्या विरोधात सर्वच पक्ष एकत्र येत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. ते एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र पुणेकरांची आम्हाला भक्कम साथ आहे. त्यामुळे लोकसभा नंतर विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचंड समर्थन आम्हाला पुणेकरांकडून मिळालं आलेला आहे. आणि या महापालिका निवडणुकीत देखील ते समर्थन आम्हाला मिळेल असं चित्र दिसत आहे.

त्यामुळे ते सगळे एकत्र लढण्याचा विचार करत आहेत. याचा अर्थ समोरचा पैलवान ताकदवान दिसत आहे. त्यामुळे हे छोटे छोटे पैलवान एकत्र येत आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्या या प्रतिक्रिया नंतर शरद पवार आणि अजित पवारांसह इतर पक्षातील नेत्यांना त्यांनी छोट्या पहिलवानांची उपमा दिल्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा दादा विरुद्ध अण्णा अर्थात अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा वाद पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT