Sandeep Deshpande : मुंबईत पुन्हा 'प्रादेशिक' विरुद्ध 'भाषिक' ठिणगी; 'बटोगे तो पिटोगे' बॅनरवरून संदीप देशपांडेंचा भाजपवर थेट हल्ला!

Sandeep Deshpande attack on BJP : ‘बटोगे तो पिटोगे’ बॅनरवरून संदीप देशपांडेंनी भाजपवर थेट हल्ला चढवत मुंबईतील प्रादेशिक विरुद्ध भाषिक राजकारण पुन्हा तापवले आहे.
sandeep deshpande
sandeep deshpandeSarkarnama
Published on
Updated on

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापले असून भाषिक मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. मुंबईत अलीकडेच “उत्तर भारतीय बटोगे… तो पिटोगे…” असे वादग्रस्त बॅनर झळकल्याने मोठी चर्चा सुरू झाली. या बॅनरवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रतिक्रिया देत सोशल मीडियावरून भाजपवर थेट आरोप केले आहेत.

या प्रकरणावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबईत लावलेल्या पोस्टरला उत्तर देण्यासाठीच त्यांनी भूमिका मांडली आहे. मराठी माणसाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. हा वाद उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा नसून जाणीवपूर्वक भाजपकडून तो पेटवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी भाजप मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

sandeep deshpande
Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंची नाराजी रंग लायी... CM फडणवीसांच्या भेटीनंतर किशोर जोरगेवारांबाबत तातडीने मोठा निर्णय!

भाजपच्या कामगिरीवरही त्यांनी टीका केली. मुंबईकरांचा आनंद निर्देशांक किती आहे, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, असे म्हणत त्यांनी विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकीकडे अटल सेतूसारखा प्रकल्प उभा राहिला असला तरी शहरातील रस्त्यांची अवस्था खड्डेमय आहे, असा टोला त्यांनी लगावला.

रोज किती मुंबईकर अटल सेतूचा वापर करतात, असा सवाल करत कचरामध्ये दोन-दोन हजार कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोपही त्यांनी केला. गेली 25 वर्षे सत्तेत असताना भाजपने काय केले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

sandeep deshpande
Prashant Jagtap : शरद पवारांचा 26 वर्षे 'विश्वासू' शिलेदार; निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा; प्रशांत जगतापांनी सांभाळलीय 'ही' मोठी पदं

याचवेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. पक्षात कोणी विचारत नसल्यानेच शेलार रामदास आठवले यांच्याकडे झुकल्याचा टोला देशपांडे यांनी लगावला. सत्तेत बसलेले लोक गुंडगिरीसारखे वागू लागले तर प्रश्न विचारले जाणारच, असे म्हणत त्यांनी विविध नेत्यांच्या नातेवाइकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि ही यादी अजून मोठी होईल, असा इशाराही दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com