MVA News : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीची बैठक पार पडली असून आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी तब्बल 17 आमदार निवडले जाणार आहेत. त्या सर्व 17 जागा लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
महायुतीची ताकद पाहता ही निवडणूक एकतर्फी होईल. मित्रपक्षांमध्ये असलेल्या चढाओढीमध्ये भाजप ही निवडणूक जागा वाटप करत बिनविरोध करण्याच्या तयारीत होती. मात्र, महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी दंड थोपटे असून 17 ही जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, आम्ही निवडणुकीला समोरे जाण्यास तयार आहोत. 17 ही जागा लढण्याचा निर्णय आमच्या बैठकीत झाला आहे.
तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, आम्ही 17 जागा लढणार आहोत.तीन जागांबाबत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र, त्यावर देखील तोडगा काढण्यात येईल. आमची 29 तारखेला दुसरी बैठक होणार आहे. त्यावेळी आम्ही नावे निश्चित करू. एक उमेदवार देऊ, अशी चर्चा झालेली आहे.
भाजपला स्वतःच्या लोकांवर देखील विश्वास राहिलेला नाही. काही विरोधातील नगरेसवकांना पाच लाख रुपये देऊन त्यांचे मोबाईल जप्त करत त्यांना उचलले आहे. तर, त्यांनी स्वतःच्या पक्षातील लोकांना देखील पाच पाच लाख रुपये देऊन उचलले आहे. आम्ही 17 जागा लढणार आहोत. गनिमीकावा वापरणार आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
सपकाळ म्हणाले, काल आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शशिकांत शिंदे देखील त्या आंदोलनात होते. आम्ही तीन तास तीन तास रस्ता जाम केला. या आंदोलनात महाविकास आघाडीने मित्र पक्ष होते. आम्ही रस्ता जाम केला आणि परिणाम सरकारमधील अर्धे मंत्रिमंडळ दिल्लीला गेले. आता गेला आहात तर हात हालवत परत येऊ नका, असा सज्जड दम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.