Parbhani-Hingoli MLC Election : मीच उमेदवार अन् मीच शिफारसदार; जिल्हाध्यक्ष भुमरेंचा पहिला नंबर! विधानपरिषदेसाठी 'या' पाच इच्छुकांची यादी सीएम फडणवीसांकडे सोपवली

Maharashtra Legislative Council election News : भाजपने संख्याबळ आणि संघटनात्मक ताकद वाढल्याचा दाखला देत जागा मागितली आहे. या पक्षात सर्वाधिक इच्छूक असून जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी इच्छुकांची यादी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे.
devendra fadnavis and Parbhani bjp leader
devendra fadnavis and Parbhani bjp leader Sarkarnama
Published on
Updated on

BJP News : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. महायुतीतील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मतदारसंघावर दावा सांगितला आहे. भाजपने संख्याबळ आणि संघटनात्मक ताकद वाढल्याचा दाखला देत जागा मागितली आहे. या पक्षात सर्वाधिक इच्छूक असून जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी इच्छुकांची यादी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे.

विशेष म्हणजे यामध्ये इच्छुक म्हणून भुमरे यांनी स्वतःचे नाव पहिल्या क्रमांकावर दिले आहे. मीच उमेदवार आणि मीच शिफारसदार अशा या प्रकाराची सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राजकारणात शिफारशीची पत्रे नवीन नाहीत, मात्र स्वतःच्या नावाची शिफारस स्वत:च करणे आणि त्यावर स्वत:च स्वाक्षरी करणे, हा प्रकार सध्या परभणी-हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

devendra fadnavis and Parbhani bjp leader
Pune MLC : पार्थ पवारांच्या भेटीसाठी इच्छुकांची रांग; पुणे MLC तिकीटाचा ‘रिमोट कंट्रोल’ कुणाकडे?

भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची यादी दिली. जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या भाजपच्या अधिकृत लेटरहेडवर पाठविण्यात आलेल्या या पत्रात पहिल्याच क्रमांकावर स्वत: सुरेश भुमरे यांचे नाव आहे.

devendra fadnavis and Parbhani bjp leader
Pune BJP News: राष्ट्रवादीनं जोर लावलेली पुण्याची जागा काबीज करण्यासाठी भाजप नेत्यांनी गाठली मुंबई; फडणवीस गेम फिरवणार?

त्यानंतर इतर इच्छुकांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूरचे सभापती गंगाधर बोर्डीकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष मुरकुटे, परभणी शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांचा समावेश आहे. त्यामुळे 'उमेदवारही मीच आणि शिफारस करणारेही मीच' अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

devendra fadnavis and Parbhani bjp leader
NCP Politics : राष्ट्रवादीमध्ये धुसफूस, शहराध्यक्ष सुभाष जगतापांच्या विरोधात थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार; 'आधी स्वतः पदे भोगली, आता...'

पार्टी विथ डिफरन्स असे बिरूद असणाऱ्या भारतीय जनता पक्षात (BJP) नुकतेच जिल्हा प्रभारी व विभागीय संयोजक नेमले आहेत. पक्षाकडे शिफारस करताना जिल्हा प्रभारी किंवा विभागीय संयोजक यांच्यामार्फत पक्षाकडे शिफारस जावी, असा संकेत आहे. त्यामुळे स्वत:च्याच उमेदवारीची स्वत: शिफारस करण्याच्या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे

devendra fadnavis and Parbhani bjp leader
NCP Politics : राष्ट्रवादीमध्ये धुसफूस, शहराध्यक्ष सुभाष जगतापांच्या विरोधात थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार; 'आधी स्वतः पदे भोगली, आता...'

पत्रात परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपची ताकद सर्वाधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपचे 119, भाजप विचारांचे 27 आणि जनस्वराज्य पक्षाचे 13 असे एकूण 139 मते भाजपकडे असल्याचे नमूद करत ही जागा भाजपलाच सोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

devendra fadnavis and Parbhani bjp leader
NCP Politics : राष्ट्रवादीमध्ये धुसफूस, शहराध्यक्ष सुभाष जगतापांच्या विरोधात थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार; 'आधी स्वतः पदे भोगली, आता...'

मात्र, या संपूर्ण पत्रातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे स्वतःच्या नावाच्या शिफारशीवर स्वतःचीच सही. राजकीय वर्तुळात यावरून मिश्किल प्रतिक्रिया उमटत असून, 'स्वतःच अर्ज, स्वतःच मंजुरी' असा टोला विरोधकांकडून लगावला जात आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया यांनी पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र ते परभणी जिल्ह्यातील रहिवासी नसल्याने स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा संघर्ष होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com