Mahavikas Aghadi  Sarkarnama
महाराष्ट्र

MVA News : मविआचा फॉर्म्युला ठरला; 'या' तारखेला होणार आता जागावाटपाची घोषणा

Political News : महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत बुधवारी बैठक पार पडली. यामध्ये 250 ते 260 जागावर तीन पक्षात एकमत झाले आहे. फॉर्म्युला जवळपास ठरला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. दसरा झाल्यानंतर पुढील आठवड्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षाकडून वेगाने तयारी केली जात आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत बुधवारी बैठक पार पडली. यामध्ये 250 ते 260 जागावर तीन पक्षात एकमत झाले आहे. फॉर्म्युला जवळपास ठरला आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटपावर गेल्या तीन दिवसापासून जोरात चर्चा सुरु आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाला जवळपास 100 जागा तर कॉँग्रेसलाही तितक्याच म्हणजे 100 जागा मिळणार आहेत तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला 88 जागा दिल्या जाणार आहेत. छोट्या मित्र पक्षांना या तीन प्रमुख पक्षांच्या कोट्यातून जागा मिळणार असल्याचे समजते.

गुरुवारी व शुक्रवारी महाविकास आघाडीतील रखडलेल्या जागांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर सर्व जागांवर सुरळीत तोडगा निघाला तर शुक्रवारी (11 ऑक्टोबरला) अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचे समजते.

गेल्या चार दिवसापासून जागावाटपाबाबत बैठका होत असून त्यामध्ये काही निकष ठरले आहेत. त्यानुसार चर्चा सुरु असून विदर्भ व मराठवाड्यातील काही जागांवर एकमत होणे बाकी आहे. या काही अडलेल्या जागेवर एकमत झाल्यानंतर फॉर्म्युला जवळपास फायनल होणार आहे. त्यानंतर लवकरच जागावाटपाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

बुधवारी झालेल्या चर्चेनंतर माहित देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, आघाडीचे जागावाटप जवळपास फायनल झाले असून त्यामध्ये बऱ्याच जागेवर एकमत झाले आहे. केवळ दहा ते 15 टक्के जागांवर एकमत होणे बाकी आहे. त्यावर चर्चा सुरु असून लवकरच या जागेवरील तिढा सोडवला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT