Kolhapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता.9) कोल्हापूर दौऱ्यावर येत एकप्रकारे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सुरुवातीला पावसात भाषणाला करताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
तसेच आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केले. एक बार कमिंटमेंंट किया, तो मै किसी की भी नही सुनता. आमचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, नाहीतर तू मंत्री असतास असं विधानही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आबिटकरांबाबत केलं.
कोल्हापूरमधील (Kolhapur) गारगोटे येथे झालेल्या विविध कामांच्या उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, प्रकाश अबिटकर याचा बॅकलॉग भरून काढणार आहे. त्यांच्या कामाची पोचपावती हा एकनाथ शिंदे देणार आहे. जिल्ह्यात एक नंबरचं मताधिक्य प्रकाश आबिटकर यांना तुम्ही दिले पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रकाश अबिटकर (Prakash Aabitkar) यांचं अॅडव्हान्समध्ये अभिनंदन केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रकाश अबिटकर यांचा कार्यसम्राट म्हणून उल्लेख करत आज धामणी प्रकल्पाला गेलो अतिशय आनंद झाला. हजारो लोक पावसात माझी वाट बघत होते. लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मला आनंद,समाधान वाटलं असंही ते म्हणाले.
प्रकाश अबिटकर निधी मागतोय, पण भूमिपूजन कुठे दिसत नाही असा विचार होता. मात्र, आज धडाकाच लावला आहे, आमदार कसा असावा? प्रकाश आबिटकरसारखा असावा. कामाशिवाय न भेटणारा एकमेव आमदार आबिटकर आहे. त्यांच्या विरोधात जो उभा राहील त्याचं डिपॉझिट जप्त होणार, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे त्यांनी व्यक्त केला.
जी लाडकी बहीण वंचित राहिली असेल, तिलाही देईन, हा मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे. अकाउंटमधील पैसे लवकर काढा, नाहीतर सरकार काढून घेईल, असा विरोधकाकडून अपप्रचार सुरू आहे. पण हे सरकार देणारं आहे. काढून घेणार नाही.न्यायालयात जाऊन बहिणीच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, असंही आबिटकर यांनी सांगितले.
सर्वसामान्य महिलेला आम्ही आधार द्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या बापाचं काय जातंय? तुमचं सरकार येणार नाही, तर बंद करायची संधी कुठून मिळणार? कोणाची हिंमत नाही. लाडकी बहीण योजना बंद करून दाखवेल, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला.
महिलांनी आशीर्वाद दिले, तर लाडके बहीण योजनेचे पैसे 3000 रुपये करणार आहे. बहिणींना देताना आम्ही हात आखाडता घेणार नाही. आम्ही योजनांच्या घोषणा करताना विरोधकांच्या पोटात दुखत आहे. ज्या दृष्ट सावत्र भावांनी तुमच्या योजनेत खोडा घातला, त्यांना योग्यवेळी जागा दाखवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तुम्हाला शक्तिपीठ महामार्ग हवा असेल तो आम्ही करणार. तुम्हाला शक्तिपीठ नको असेल तर आम्ही रद्द करणार आहे. तुमच्या मनाविरुद्ध सरकार कोणतेही काम करणार नाही. शक्तिपीठ रद्द, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे. एकदा शब्द दिला तर शब्द पुन्हा फिरवणार नाही. तुम्हाला जे हवं तेच देणार सरकार या राज्यात आहे. असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
हरियाणाचा निकाल पाहताच सुरुवातीला जिलेबी आणि लाडू वाटत होते. पण तिथे मतदारांनी विकासाला मतदान केले.मात्र या निकालाने विरोधकांचा अहंकार फुटला. फेक निगेटिव्ह पसरून परत परत खोटं बोलता येत नाही. हे हरियाणाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.